मनमाड शहरासह नांदगावं तालुक्यात तापमानात मोठी वाढ..पारा 41 अंशांवर..आरोग्य विभाग अलर्ट मोडवर.. उपजिल्हा रुग्णालयात सुरु करण्यात आला उष्माघात कक्ष


मनमाड शहरासह नांदगावं तालुक्यात तापमानात मोठी वाढ..पारा 41 अंशांवर..आरोग्य विभाग अलर्ट मोडवर..
उपजिल्हा रुग्णालयात सुरु करण्यात आला उष्माघात कक्ष
मनमाड(अजहर शेख) :- मनमाड शहरा सोबत नांदगावं तालुक्यात तापमानात मोठी वाढ झाली असून पारा 41 अंशां पर्यन्त गेल्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर येऊन मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात  उष्माघात कक्ष सुरु करण्यात आले आहे. महत्वाचे काम असेल तरच नागरिकांनी घरा बाहेर पडावे त्याशिवाय बाहेर पडू नये उन्हात थोडा जरी त्रास जाणवत असेल तर तातडीने हॉस्पिटल मध्ये येऊन तपासणी करून घ्यावी असें उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ निलेश जेजुरकर यांनी  केले आहे
                   मनमाड शहराचा नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उष्णता जाणवत असून सध्या तापमान 41 अंशापर्यंत गेली असून राज्याच्या हवामान खात्याने देखील येत्या दोन ते तीन दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची शक्यता आहे सुरक्षेचा उपाय म्हणून उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष तयार करण्यात आला असून या कक्षात उन्हापासून त्रास होणारे व्यक्तींना ऍडमिट करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून ठेवण्यात आले आहे महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे शक्यतो सकाळी अकरा वाजेच्या आत आपले काम आटोपून आपल्या घरी किंवा सुरक्षित स्थळी सावलीत थांबावे जास्तीत जास्त पाणी द्यावे ताक लिंबू शरबत यासारखे थंड पेय प्यावे उष्णतेचा थोडा जरी त्रास जाणवला तर तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावे असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ निलेश जेजुरकर यांनी केले आहे
जास्तीत जास्त पाणी प्यावे..!
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तापमान ४०४१ अंशाच्या वर असते शक्यतो आपले काम हे सकाळी किंवा सायंकाळी पाच नंतर करावी फारच गरज असेल तरच उन्हात बाहेर पडावे बाहेर पडताना आपले मनापासून संरक्षण व्हावे यासाठी टोपी वापर किंवा छत्री यांचा वापर करावा अंगाला मोकळे वाटेल असे कपडे घालावे जास्तीत जास्त पाणी प्यावे ताक नींबू शरबत मठ्ठा यासारखे थंड पदार्थ घ्यावे उपाशीपोटी बाहेर पडू नये मनापासून संरक्षण करण्याकरता वरील उपाय करावे
डॉ रसिका धाडेलवैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!