थकबाकीदार असलेल्या गाळ्यांना लावले सील…? बघा कोणते गाळे केले सील
मनमाड( राजेंद्र धिंगाण):- मनमाड पालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्या वतीने आज दिनांक 22/03/2024 धडक कारवाई अंतर्गत घरपट्टी पाणीपट्टी तसेच गाळे भाडे धारकांवर कारवाई करण्यात आली याप्रसंगी मनमाड शहरातील सानप कॉम्प्लेक्स येथील गाळे भाडे धारक यांच्यावर नगरपालिकेची थकबाकी पोटी मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये गाळा सील करण्यात आला असून सदर थकबाकीदारांना याबाबत सूचना देण्यात आले असून आपण लवकरात लवकर आपल्याकडील थकबाकी गाळे भाडे तसेच नगरपालिकेतील मालकीचे गाळे वरील थकबाकी भरून नगरपालिकेचे करार नूतनीकरण करून घ्यावे असे आव्हान मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी दिले आहे या कारवाईमध्ये बांधकाम विभागाचे अझर शेख सहाय्यक कर अधीक्षक मनोज मगर कराधीक्षक पुष्पक निकम कैलास पाटील उमेश सोनवणे गाळे भाडे प्रमुख निलेश सपकाळे अमोल बहोत राजू जगताप इत्यादींनी कारवाई मध्ये भाग घेतला तरी सर्व थकबाकी धारक यांनी आपली घरपट्टी पाणीपट्टी व गाळे भाडे भरून नगरपालिकेत सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे