पालिकेच्या मलेरिया विभाच्या वतीने जनजागृती मोहीम..
मनमाड ( राजेंद्र धिंगाण):- मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांचे आदेशान्वये तसेच मलेरिया विभाग प्रमुख कैलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहरातील टकार मोहल्ला , हुसैनी चौक , मोहसिन नगर , राजवाडा ,रोहिदास वाडा , महावीर भवन या भागात डासअळीनाशक फवारणी , कंटेनर तपासणी , हस्तपत्रके वाटप तसेच गप्पी मासे सोडण्यात येउन जनजागृती करण्यात आली.
या विशेष मोहिम मध्ये कर्मचारी. बाबासाहेब काळे , प्रकाश डिंबर , चंद्रकांत शिंदे , जुबेर पटेल , शंकर कांबळे , अमित देवळे , राहूल आढाव , रोहित शिंदे , मयुर जाधव , संजय चौधरी , रंजना बगाडे सहभागी होते.