इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक ; बाजीराव महाजन फ़ुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचचा स्तुत्य उपक्रम
इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक ; बाजीराव महाजन फ़ुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचचा स्तुत्य उपक्रम
मनमाड(अजहर शेख):- मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमाजन निमित्ताने होणारी इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे गेल्या अठरा वर्षांपासून फ़ुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच हा स्तुत्य उपक्रम करतो आहे सध्या देशात हिंदू मुस्लिम या दोन समाजात तेढ निर्माण करून तरुणांची माथी भडकावून त्यांना दंगली करण्यासाठी उस्फुर्त केले जात आहे मात्र आपण आपल्या घरातील तरुणांना यापासुन दूर ठेवले पाहिजे यासाठी आपल्या घरातील तरुण कुठे जातो मोबाईलवर काय करतो याकडे लक्ष दिले पाहिजे तसेच कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता एकता बंधुता समता या मार्गाने कायदा सुव्यवस्था कशी अबाधित राहील याकडे लक्ष दिले पाहिजे आजच्या या परिस्थितीत फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे जो एकोप्याचा संदेश दिला जात आहे आणि यासाठी या मंचतर्फे जे काही उपक्रम राबविले जातात याबद्दल त्यांचे करावे तितके कौतुक कमी आहे असे स्पष्ट मत इफ्तार पार्टीच्यावेळी उपविभागीय पोलिस अधीक्षक बाजीराव महाजन यांनी व्यक्त केले येथील उस्मानिया चौकात आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय रोजा इफ्तार पार्टीत ते बोलत होते यावेळी मंचावर प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे,तहसीलदार सुनील सौदाने,पोलिस निरीक्षक विजय करे,मुख्याधिकारी शेषराव चौधरी, मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिह,मौलाना उस्मान, 52 नंबर मधील मोहम्मदी मदरशाचे मौलाना अय्युब, भन्ते दीपकंर,डॉ सुनील बागरेचा, नगरसेवक कैलास पाटील महावितरण अधिकारी संदीप तळेले मंचचे अध्यक्ष मिर्जा अहमद बेग शहरातील सर्व धर्मीय धर्मगुरू राजकीय शैक्षणिक समाजिक क्षेत्रातील नेते कार्यकर्ते व हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवकन्या संगिता सोनवणे यांनी फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचमध्ये सर्व समाजाचे लोक आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून यांचे अनेक उपक्रम सुरू आहेत असे मत व्यक्त केले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी यावेळी आपल्या भाषणात फ़ुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे काम कौतुकास्पद असुन गेल्या 18 वर्षांपासून यांचा सुरू असलेला उपक्रम भविष्यात देखील असाच सुरू रहावा खऱ्या अर्थाने आज देशाला छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहु आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे आणि तेच काम या संस्थेच्या वतीने सुरू आहे त्यांना शुभेच्छा देतो असे मत मांडले तर प्रसिद्ध डॉ सुनील बागरेचा यांनीही शुभेच्छा दिल्या वंचीत बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष आम्रपाली निकम , कामगार नेते सतिष केदारे,सिटूचे रामदास पगारे महावितरण अधिकारी संदीप तळेले ,यांच्यासह इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी शहरातील राजकीय सामजिक शैक्षणिक कामगार क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद आहिरे यांनी केले तर आभार आमिन नवाब शेख यांनी मानले कार्यक्रमाचे संयोजन फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख,इस्माईल पठाण,सचिव विलास आहिरे,शकुर शेख,सद्दाम अत्तार, जावेद शेख,राहील पठाण,जाकिर पठाण,ज्ञानेश्वर शिंदे,राहील मंसुरी, युसुफ बागवान, हाजी रफिक बाबुजी, हाजी शफी यांच्यासह फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————— —————————— —
फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचचा अठरा वर्षापासून उपक्रम…!सध्या देशातील परिस्थिती ही हिंदू मुस्लिम वाद विवाद करण्यासाठी सरसावली असताना गेल्या अठरा वर्षांपासून फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचने जातीय सलोखा जोपासला आहे शिव जयंती आंबेडकर जयंती यासह मानवतावादी संदेश देणारे सर्वच महापुरुष यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविले जातात यासह सर्वच सण उत्सव साजरे केले जातात त्याचप्रमाणे रोजा इफ्तार पार्टी देखील करण्यात येते यंदा फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे हे एकोणिसावे वर्ष होते.या पार्टीला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.

फोटो कप्शन
फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचतर्फे आयोजित रोजा इफ्तार पार्टीत महत्व समजून सांगताना मुस्लिम धर्मगुरू व इतर सर्वधर्मगुरू,तर दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित हिंदू मुस्लिम बांधव(छाया अजहर शेख)