साहेब आम्ही जम्मू काश्मीरला राहतो की पाकिस्तानला…? सौचालय साफ करण्यासाठी कराव्या लागताय अधिकाऱ्यांच्या रावण्या…
साहेब आम्ही जम्मू काश्मीरला राहतो की पाकिस्तानला…? सौचालय साफ करण्यासाठी कराव्या लागताय अधिकाऱ्यांच्या रावण्या…
मनमाड(अजहर शेख):- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत करोडो रुपये खर्च करणाऱ्या या देशात आजही महिलांना आपले सार्वजनिक सौचालय( टॉयलेट) स्वच्छता करण्यासाठी अधिकारी वर्गच्या रावण्या कराव्या लागतात मात्र तरीही अधिकारी या भागातील लोकांना जणूकाही ते जम्मु काश्मीर किंवा पाकिस्तानी आहेत आणि त्यांचे काम खूपच अवघड आहे असे दाखवतात. हा सर्व प्रकार मनमाड नगर पालिकेच्या हद्दीतील मोबाईल सौचालयाचा आहे याठिकाणी ना नगरसेवक लक्ष देतात ना कर्मचारी ना अधिकारी आमचा गुन्हा तरी काय असा सवाल येथील महिलांनी उपस्थित केला आहे.?

मनमाड नगर पालिकेच्या स्वच्छता विभागाचे काम म्हणजे सरकारी काम अन दोन महिने थांब असेच आहे कारण येथील मातोश्री रमाबाई नगर भागात असलेल्या महिलांच्या मोबाईल सौचालयाला स्वच्छता नावाचा प्रकार माहिती नाही मनमाड नगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने गावांतील सर्व सार्वजनिक सौचालय मोबाईल सौचालय व मुताऱ्या या नित्यनेमाने स्वच्छता केल्या जातात मात्र मातोश्री रमाबाई नगर मधील महिला सौचालय हे अजिबात सांगितले तरी स्वच्छ केले जात नाही याबाबत स्वच्छता निरीक्षक भामरे यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता मी याबाबत माहिती घेतो त्या भागाचे स्वच्छता कर्मचारी यांच्याशी बोलतो आणि स्वच्छ करतो असे आश्वासन दिले त्या गोष्टीलाही आठ दिवस झाले आहे मुळात पालिका कर्मचारी व अधिकारी यांना तोंड बघून काम करण्याची सवय लागली आहे यामुळे जोपर्यंत विशिष्ट लोकांचा फोन जात नाही तोपर्यंत ते काम होत नाही मुळात बाकीच्या सौचालया प्रमाणे या सौचालयाला का स्वच्छ केले जात नाही आम्ही जम्मू काश्मीर किंवा पाकिस्तानी आहोत का.? की आम्ही टॅक्स भरत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.मुळात अधिकारी आणि कर्मचारी किंवा स्थानिक नगरसेवक देखील याकडे लक्ष देत नाही
स्वच्छता निरीक्षक व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष….मनमाड मधील सर्व सार्वजनिक सौचालय व मुताऱ्या या मनमाड नगर पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून स्वच्छ केल्या जातात मात्र मातोश्री रमाबाई नगर या भागातील हे महिला मोबाईल सौचालय याला अपवाद आहे या सौचालयाकडे मात्र स्वच्छता निरीक्षक व कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष आहे.