मनमाड पालिकेच्या वतीने घर घर संविधान अभियान संपन्न…
मनमाड( राजेंद्र धिंगाण):- भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने संविधान अमृत महोत्सव सन 2024 25 च्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार घर घर संविधान या अभियान अंतर्गत आज मनमाड नगरपरिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे संविधानाचे मुख्य व्याख्याते तुषार पगारे पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक विजय करे संविधान चे सहव्याख्याते सुनील, संविधान सहाय्यक व्याख्येते चंद्रकांत इंगळे तसेच मनमाड नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला… यावेळी पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन यांनी संविधाना संदर्भामध्ये मनोगत व्यक्त केले सुनील लासुरे चंद्रकांत इंगळे सर यांनी देखील संविधान पर मार्गदर्शन केले तसेच श्री तुषार पगारे सर मुख्य व्याख्याते यांनी संविधान पर अत्यंत प्रभावी व्याख्यान दिले…. यावेळी संविधाना संदर्भात समज गैरसमज या विषयासंदर्भात अत्यंत चांगले मार्गदर्शन पगारे यांनी केले.. यावेळी मनमाड नगर परिषदेचे कॉम्प्युटर इंजिनिअर दाडगे साहेब, सोनारे सर,,, भांबरे पुष्पक निकम, मनोज मगर, पाटील सर, लेखापाल सतीश सानप व इतर अधिकारी तसेच मोठ्या संख्येने कर्मचारी, व पोलीस कर्मचाऱ्यांसह नागरिक ही उपस्थित होते .. सदर कार्यक्रमाचे नियोजन श्री रवी थोरे व सूत्रसंचालन श्री किरण आहेर यांनी केले.