ॲड.योगेश बनकर यांची भारत सरकार नोटरीपदी नियुक्ती..!
ॲड.योगेश बनकर यांची भारत सरकार नोटरीपदी नियुक्ती..!
मनमाड(अजहर शेख):- मनमाड वकील संघाचे ॲड.योगेश बनकर यांची भारत सरकार नोटरीपदी नियुक्ती झाली असून, भारत सरकारने नोटरी सर्टिफिकेट बहाल केले त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.मातोश्री रमाबाई नगर या ठिकाणी राहणारे बनकर हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असुन येथील सेंट झेवीयर हायस्कूल येथे त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले व यानंतर मनमाड महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले 2013 साली त्यांनी वकिलीची पदवी मिळवली व तेव्हापासून ते आजपर्यंत मनमाड न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत त्यांची भारत सरकार नोटरी पदी नियुक्ती झाल्याने सर्व थरात त्यांचे स्वागत आणि अभिनंदन करण्यात येत आहे.