मनमाडला भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल टाकीला आग…?
मनमाडला भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल टाकीला आग…?
मनमाड (आवेश कुरेशी ):- मनमाड मध्ये असलेल्या पानेवाडी इंधन प्रकल्पातील भारत पेट्रोलियम या कंपनीत सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान अचानक फायर अलार्म वाजायला लागला फायर अलार्म वाजताच एकच धावपळ सुरू झाली आणि काही क्षणात इंधन कंपनीत इंधन साठा साठवणाऱ्या सर्वात मोठ्या टाकीला वरच्या बाजूला आग लागल्याचे कळाले आणि काही क्षणातच इंधन कंपन्यातील सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाली आजूबाजूला असलेल्या सर्व कामगारांनी आग लागल्यावर काय करायचे हे माहीत असल्याने तात्काळ आपले काम सुरू केले व आग विझवण्यासाठी इंधन कंपन्या मधील फायर फायटर मशीन सुरू केली या मशीन मधून हजारो लिटर फोम व पाणी आग लागली त्या टाकीवर मारण्यात आले अवघ्या पाच ते सात मिनिटात मनमाड नगरपालिकेचे अग्निशमन वाहन हजर झाले त्यांनी देखील आग विझवण्यास मदत केली या सर्व प्रकारात एक कर्मचारी जखमी झाला रुग्णवाहिकेत त्याच्यावर देखील प्रथम उपचार करून त्याला वाचवण्यात आले टाकीवरील आग विझत असतानाच दुसऱ्या ठिकाणी वाल असलेल्या पाईपलाईन मधून इंधन लिकेज होऊन तेथे आग लागली आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपला मोर्चा त्या ठिकाणी वळवला व त्याचे देखील फायर फायटर मशीन द्वारे फोम मारून तेथील आग देखील आटोक्यात आणली हा सगळा प्रकार घडत असताना अवघ्या काही क्षणात कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली आग विझविण्यात आल्या नंतर समजले की ही खरी खरी आग नव्हती तर आग लागल्यानंतर काय काळजी घ्यावी यासाठी प्रत्यक्ष अर्थात मॉक ड्रिल करण्यात आले होते
मनमाड शहरा नजीक असलेल्या नागापूर पानेवाडी या ठिकाणी इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम यासह एलपीजी बॉटलिंग प्लांट आहे या इंधन कंपनीमध्ये दररोज लाखो लिटर पेट्रोल डिझेल याशिवाय चेनल असे वेलनशील पदार्थ स्टोरेज केले जातात व टँकर व रेल्वेच्या वेगेन मार्फत ते राज्यभरात पाठवले जातात एके प्रकारे जिवंत बॉम्ब मनमाड शहराच्या आसपास वाजू बाजूच्या गावा मध्ये आहे जर या ठिकाणी आग लागली तर काय काळजी घ्यावी यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने मॉक ड्रिल अर्थात सराव घेण्यात येतो असाच सराव आज घेण्यात आला मात्र आग लागल्यापासून ते आग विझेपर्यंत ही खरी खरी आग नसून आग लागल्यानंतर काय करावे व आगेवर कशाप्रकारे नियंत्रण आणायचे याची रंगीत तालीम अर्थात मॉक ड्रिल घेण्यात आली सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास अचानक भारत पेट्रोलियम कंपनीमधून फायर आलाराम वाजला आणि एकच धावपळ उडाली कोणाला काही समजायचे आत इंधन कंपनीच्या सर्वात मोठ्या टाकीला आग लागल्याची बातमी कळली आणि इंधन कंपनी मधील सर्व कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले मनमाड नगरपालिकेची फायर फायटर गाडी देखील अवघ्या काही मिनिटात तेथे पोहोचली व त्यांनी देखील आग विझवण्यास मदत केली हे सर्व इतके चांगले करण्यात आले की कोणीही हा संपूर्ण कार्यक्रम अवरेपर्यंत ओळखू शकले नाही की ही खरी खरी आग नसून आग लागल्यानंतर काय करायचे ते प्रात्यक्षिक होते यावेळी भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपनीचे डेपो मॅनेजर पोलीस उपविभागीय अधीक्षक बाजीराव महाजन नागपूरचे सरपंच राजेंद्र पवार यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते