सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
मनमाड(आवेश कुरेशी):- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. जयश्री पारखे ,शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम, माननीय उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, माननीय पर्यवेक्षक श्री अनिल निकाळे सर व सर्व महिला शिक्षिका व्यासपीठावर उपस्थित होत्या. व्यासपीठावरील उपस्थित सर्व शिक्षिकांचा माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम व पर्यवेक्षक . अनिल निकाळे सर यांच्या हस्ते गुलाबपुष्प व छोटीशी भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कुमार कार्तिक काकुळते याने केले. कुमार प्रज्वल बोथरा याने महिलांचे महत्त्व आपल्या भाषणातून सांगितले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून सौ.पारखे मॅडम यांनी महिलांची बलस्थाने सांगितली.मा.मुख्या.फादर माल्कम यांनी आपल्या भाषणातून समस्त शिक्षिकांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात. अध्यक्षीय निवडीची सूचना साकीब शेख याने केली तर अनुमोदन सुशांत राऊत याने दिले. कुमार सार्थक तिरुख याने आभार प्रदर्शन केले.यानंतर शाळेतील समस्त महिला शिक्षिकांनी लघु नाटीका सादर करुन स्त्री पुरुष समानतेच्या पुरस्कार केला.