जागतिक महिला दिनानिमित्त एन आर एम यु तर्फे नारी शक्तीला सलाम
जागतिक महिला दिनानिमित्त एन आर एम यु तर्फे नारी शक्तीला सलाम
मनमाड(अजहर शेख):- नॅशनल रेल्वे मजदूर युनियन ओपन लाइन शाखा मनमाड कार्यालय येथे दिं ०८ मार्च २०२५ रोजी ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवकी हॉस्पिटल मनमाड स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ पूनम राजपूत , वकील श्रीमती गुप्ता , प्राध्यापिका श्रीमती अलका नागरे , रेल्वे पोलीस श्रीमती संतोषी राठोड .प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे यांनी भाषणात ‘जागतिक महिला दिनाच्या’ शुभेच्छा दिल्या व महिला कामगारांना जीवनात कठीण परिश्रम करून उतुंग भरारी घेण्यासाठी प्रेरित केले.कार्यक्रमाला उपस्तित भुसावळ मंडळचे कोषाध्यक्ष तसेच मनमाड ओपन लाइन शाखेचे सचिव कॉ ए डी निकम साहेब यांनी प्रशासना कडून महिलांना मिळणारी सुविधा व त्या सुविधांना युनियनच्या एकजुटीने कशी आबादीत ठेवता येईल या संदर्भात महिला कामगारांना मार्गदर्शन केले. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन ओपन लाइन मनमाड शाखेचे महिला अध्यक्षा कॉ ललिता ताई गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणात महिला कामगारांना संबोधित केले, त्यानंतर शाखेचे अध्यक्ष कॉ शबरीश नायर यांनी कार्यक्रमाला उपस्तीत प्रमुख पाहुण्यांचे तसेच सर्व महिला कामगारांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखेचे कोषाध्यक्ष कॉ आनंद भारस्कर, वरिस्ट कॉ चंद्रशेखर खैरे , कॉ सोनाली आहेर , सहसचिव कॉ सुरेश पगारे, सहसचिव कॉ सुनील ताडगे, युवा कॉ संभाजी धनवटे, कॉ विजय गायकवाड, कॉ अभय मोते, कॉ संजय पाटील यांनी मेहनत घेतली.