चौथ्या दिवशी रवी निकम यांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित…!


चौथ्या दिवशी रवी निकम यांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित…!


मनमाड (अजहर शेख):- मनमाड शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या मागील देशी दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद व्हावे अन्यथा स्थगित करण्यात यावी या मागणीसाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते रवी निकम यांनी गेल्या चार दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी आमरण उपोषण सुरू केले होते आज चौथ्या दिवशी निकम यांची प्रकृती खालावल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क मनमाड नगरपरिषद मनमाड शहर पोलीस तसेच तहसील कार्यालय या चौघांच्या मध्यस्थीने लेखी आश्वासन दिल्यानंतर निकम यांचे उपोषण काही काळासाठी स्थगित करण्यात आले यावेळी तहसीलदार सुनील सौंदाणे पोलीस निरीक्षक विजय करे मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी तसेच राज्य उत्पादन शुल्काचे पोलीस निरीक्षक घायाट यांनी निकम यांना कारवाई करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

Advertisement
              याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण करतील पुतळा आहे या पुतळ्याच्या 27 मीटर अंतरावरच नियमबाह्य देशी दारू दुकान आहे या देशी दारू दुकानात शहरातील दारुडे तसेच बाहेरील प्रवासी देखील दारू पिऊन धिंगाणा घालतात मागील वीस दिवसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ चार वेळेस अनुचित प्रकार घडला मात्र पोलीस निरीक्षक यांनी परिस्थितीची गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई केली याबाबत मनमाड शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र निकम यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पुरावे निश्चित तक्रार केली मात्र या विभागातर्फे कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही यामुळे दहा फेब्रुवारीपासून रवी निकम यांनी आमरण उपोषण सुरू केले होते आज उपोषणाचा चौथा दिवस होता उपोषणाच्या चौथ्या दिवशी रवी निकम यांची प्रकृती ढासाळल्याने शहरातील भीमसैनिक आक्रमक झाले होते यामुळे आज वातावरण तापले शहरातील भीमसैनिकांतर्फे उद्या मनमाड बंदची हाक देखील पुकारण्यात आली याची तात्काळ दखल घेत तालुका दंडाधिकारी म्हणून तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी निकम यांची भेट घेतली सर्व परिस्थिती समजावून घेत पोलीस निरीक्षक मुख्याधिकारी व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांच्याशी बैठक करून येत्या तीन दिवसात जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडे अहवाल पाठवून लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर रवी निकम यांनी आपले आमरण उपोषण काही काळाकरिता स्थगित केले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी भाऊ गायकवाड एस एम भाले गुरु कुमार निकाळे प्रवीण निकाळे कोमल निकाळे मनीष चाबुकस्वार विशाल पाटील सिद्धांत पाटील सचिन शिरूड विलास आहिरे विनोद अहिरे हिरामण मनोहर संदीप नरवडे जयकुमार फुलवाणी यांच्यासह इतर सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यास महिला कार्यकर्ते व पद अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!