उपोषणकर्ते रवी निकम यांची प्रकृती खालावली… भिमसैनिक आक्रमक पवित्र्यात…!
उपोषणकर्ते रवी निकम यांची प्रकृती खालावली… भिमसैनिक आक्रमक पवित्र्यात…!
मनमाड(अजहर शेख):- मनमाड शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील देशी दारू दुकान बंद किंवा स्थलांतरित करावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रवी निकम यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाचा चौथा दिवस असुन रवी निकम यांची प्रकृती खालवली असुन आज त्यांनी उपचार घेण्यासाठी नकार दिला आहे सकाळी वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी करून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यासाठी विनंती केली मात्र निकम यांनी नकार दिला आहे भिमसैनिक आक्रमक झाले असुन आज याबाबत निर्णय झाला नाही तर भिमसैनिक कोणत्याही क्षणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे.