पाकिजा कॉर्नवर सुलभ सौचालयच होणार लेखी आश्वासनानंतर राजवाडयातील उपोषण मागे….!
पाकिजा कॉर्नवर सुलभ सौचालयच होणार लेखी आश्वासनानंतर राजवाडयातील उपोषण मागे….!
मनमाड(अजहर शेख):- सुलभ सौचालय जागी सुलभ बांधावे यासाठी राजवाडा परिसरातील नागरिकांतर्फे सिद्धांत पाटील हे पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले होते काल रात्री उशिरा मुख्याधिकारी शेषराव चौधरी माजी नगराध्यक्ष राजेंद्र आहिरे,नगर रचना अभियंता अज्जूभाई शेख यांच्यासह इतर शिष्टमंडळाने उपोषण कर्त्याची भेट घेतली व लेखी आश्वासन देऊन सुलभ सौचालय जागी सुलभ सौचालय बनवण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
गेल्या चाळीस वर्षांपासून असलेले सुलभ सौचालय नूतनीकरण करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता मात्र पालिकेच्या वतीने याठिकाणी सुलभ सौचालय ऐवजी व्यापारी संकुल बनवण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली होती मात्र यामुळे राजवाडा तेली गल्ली या ठिकाणच्या रहिवाशांना उघड्यावर सौचालयास जाण्याची वेळ आली होती याविरोधात राजवाडा येथील रहिवासी यांच्यातर्फे पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते याठिकाणी आता सुलभ सौचालयच होणार असल्याचे लेखी आश्वासन मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी दिल्या नंतर रात्री उशिरा उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक विजय करे रिपाइंचे युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे,बहुजन समाज पक्षाचे प्रवीण पगारे कोमल निकाळे,वैशाली पगारे यांच्यासह इतर भिमसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.