सेंट झेवियर स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
मनमाड(आवेश कुरेशी) :-येथील सेंट झेवियर स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक रे.फादर माल्कम अध्यक्ष म्हणून तर उप मुख्याध्यापिका सिस्टर जोत्स्ना, माननीय पर्यवेक्षक अनिल निकाळे सर, फादर लॉईड दहावी अ ब चे वर्गशिक्षक सौ.अंजलिना झेवियर मॅडम , हेमंत वाले सर, दहावी अ ब चे विद्यार्थी प्रतिनिधी कु.दिव्यांका पाटील ,कु.साहिल चव्हाण (इ.१०वी अ)कु.ज्ञानेश्वरी होन,कु. भूषण निकम (इ.१० ब)आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी समीक्षा लहिरे व कुमारी प्रिया पाथरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमार आदित्य आहेर याने केले. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. तर वर्गशिक्षक हेमंत वाले सरांनी आपल्या भाषणातून एक प्रेरणादायी कथा सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तसेच इयत्ता दहावीच्या कु. साई आव्हाड व कु. रोशनी शेख या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तर इयत्ता नववी तर्फे कुमारी आरती अहिरे या विद्यार्थिनीने आपल्या भाषणातून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याच्या स्नेहमयी आठवणी सांगून त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात शालेय गायन ग्रुपने,’ चलते चलते मेरे ये गीत याद करना ‘ हे गीत सादर करून वातावरण अधिकच भाव विभोर केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला अल्पशी भेटवस्तू देऊन शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.