मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी गुण गौरव समारंभ संपन्न
मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी गुण गौरव समारंभ संपन्न
मनमाड(अजहर शेख): महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे वार्षिक गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय स्टेट बँक मनमाड शाखेचे शाखाप्रमुख श्री. विजयकुमार दीपक हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात “तुमच्यात असलेले ध्येय, चिकाटी, संयम तुम्हाला उंच घेऊन जाते. तसेच उच्च प्रतीचे यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमा शिवाय दुसरा पर्याय नाही असे प्रतिपादन केले.
तसेच पालकांनी देखील मुलांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्यामध्ये करिअर करण्याची संधी द्यावी जेणेकरून विद्यार्थी आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये सहज आणि चांगल्या प्रतीचे यश संपादन करू शकेल असे मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जग अतिशय वेगाने बदलत आहे, सध्या एका बटनावर सगळी माहिती उपलब्ध होत आहे. शिक्षणातून कौशल्य मिळाले नाही तर शिक्षण व्यर्थ ठरते, तुमचे पालक तुमच्यासाठी काय करतात याचा विचार करू नका आपण आपल्या पालकासाठी काय करू शकतो याचा विचार करा. अपयशावर मात करून पुढे जाण्याची तयारी ठेवा तसेच पालकांनी मुलांवर विश्वास ठेवून त्यांच्या पंखांना बळ द्यावे व त्यांच्यावर विश्वास ठेवावा तरच विद्यार्थी जागतिक स्पर्धेत टिकेल असे मत डॉ.पाटील यांनी व्यक्त केले याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून महाविद्यालयाच्या विकास समिती सदस्य श्रीमती अलकाताई शिंदे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले यांनी केले. वरिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल डॉ. रघुनाथ वाकळे यांनी कनिष्ठ महाविद्यालयाचा अहवाल प्रा. अमोल देसले यांनी तर क्रीडा विभाग अहवाल क्रीडा अधिकारी प्रा. संतोष जाधव यांनी सादर केला. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे कुलसचिव समाधान केदारे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुभाष अहिरे, किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य पि. के. बच्छाव, प्रा. विठ्ठल फंड, प्रा. शरद वाघ, डॉ. विष्णू राठोड, डॉ. एस. बी. घुगे महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ पावडे व डॉ. आरती छाजेड यांनी केले. तर आभार शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. देविदास सोनवणे यांनी व्यक्त केले