समाजामध्ये पत्रकाराची भूमिका महत्वाची ;प्रमोद चिंचोले
नांदगाव (महेश पेवाल ):; लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून पत्रकारितेची जबाबदारी अत्यंत महत्वाची आहे.“उघडा डोळे बघा नीट” या टॅग लाईननुसार पत्रकारांची भुमिका समाजामध्ये फार महत्त्वाची आहे आजकाल पत्रकारिता ही विकाऊ झाली असुन पत्रकारांनी समाजाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन नांदगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी नांदगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी केले. पत्रकार दिनानिमित्त नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्नित नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधत शैक्षणिक, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी
प्रमोद चिचोले होते. व्यासपीठावर जेष्ठ पत्रकार विजय चोपडा, संजीव धामणे, संजीव निकम, बब्बुभाई शेख,पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष संजय मोरे, उपस्थित होते.याप्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमेसह पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार संजीव निकम यांनी बोलतांना सांगितले की,
या क्षेत्रात अनेकांनी यावे, कोणीही देईल यावर न थांबता यासाठी वाचन व मनन करणे महत्त्वाचे आहे.नाशिक जिल्ह्याच्या शेवटच्या दुर्लक्षीत तालुक्यात राहून पत्रकारिता आपण करत आहात ही कौतुकास्पद बाब आहे. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार बब्बुभाई शेख, समाधान चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अनिल आव्हाड यांनी केले..यावेळी , चंचल गंगवाल, महेश पेवाल,मोहम्मद शेख, मंगेश सोनस, गणेश जाधव, परवेज शेख विजय धामणे, विजय भावसार,अझर शेख, सुहास पुणतांबेकर सतिष परदेशी, सचिन गायकवाड , बाबासाहेब काळे, सचिन पांडे, निखिल मोरे, रईस शेख, संतोष खताळ,आवेश कुरेशी, जुनैद शेख, विलास आहिरे,डॉ. हिरामण मनोहर पत्रकार उपस्थित होते.