मनमाडला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ थुंकले…भिमसैनिक आक्रमक… चार दिवसांत घडली दुसरी घटना…प्रशासनावर ताशेरे
मनमाडला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ थुंकले…भिमसैनिक आक्रमक… चार दिवसांत घडली दुसरी घटना…प्रशासनावर ताशेरे
मनमाड(अजहर शेख):- देशात सध्या अतिशय गढूळ वातावरण आहे परभणी आणि पंजाब या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली तसाच काहीसा प्रकार मनमाड शहरात देखील घडला असुन येत्या चार दिवसांत रेल्वे स्टेशन समोर असलेल्या पुतळ्याजवळ गैरप्रकार घडला आहे 3 दिवसाआधी एकाने लघवी केली आणि काल तर पायऱ्यावर पान खाऊन थुंकले या घटनेची माहिती मिळताच भिमसैनिक आक्रमक झाले असुन त्यांनी तात्काळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन पाहणी केली अग्निशमन आणुन संपूर्ण पुतळा धुवून काढला यावेळी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरण्यात आले डॉ बाबासाहेब आंबेडकर असो किंवा इतर महापुरुष यांच्या पुतळ्याची संरक्षण करण्याची जबाबदारी ही पालिका प्रशासनाची आहे आणि ते कर्तव्यात कसूर करत आहेत यामुळे आम्ही आता थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे भिमसैनिकाच्या वतिने सांगितले आहे.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या पुतळा परिसरात असलेले दारूचे दुकान देखील बंद करावे यासाठी आर टी आय कार्यकर्ते रवी निकम आमरण उपोषणाला बसणार आहेत.