बहुजन समाज पार्टी नांदगाव विधानसभेच्या वतिने पंजाब घटनेचा निषेध…!
बहुजन समाज पार्टी नांदगाव विधानसभेच्या वतिने पंजाब घटनेचा निषेध…!
मनमाड(अजहर शेख):- पंजाब राज्यातील अमृतसर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास क्षती व भारतीय राज्य घटनेची तेथे ठेवलेल्या प्रतिकृती जाळणाऱ्या दोषी वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन त्यास फाशीची शिक्षा व्हावी अमृतसर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना अत्यंत दुःखद संतापजनक असुन संपूर्ण देशात अशांतता पसरवून अराजकता निर्माण व्हावी असा डाव देश विघातक शक्ती करते आहे सदर घटनेस जबाबदार पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान सरकार हे असुन राज्यातील कायदा सुव्यवस्था राखणे महापुरुषांच्या स्मारकाचे संरक्षण करणे हि राज्य सरकारचिच जबाबदारी आहे यास मुख्यमंत्री भगवंत मान हेहि तितकेच जबाबदार आहे सदर घटनेतील आरोपींना अटक करण्यात आलेली असली परंतु सदर घटनेची चौकशी करून दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून बहुजन समाज पार्टी नांदगाव विधानसभा तथा मनमाड शहर युनिटच्या वतीने मनमाड शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनावर प्रविण डी पगारे बहुजन समाज पार्टी नांदगाव विधानसभा अध्यक्ष. ना वि उपाध्यक्ष दिपक गायकवाड. मनमाड शहर अध्यक्ष गौतम गायकवाड कैलास गायकवाड. एजाजभाई शेख. विशाल पाटील. राजेंद्र जगताप पेंटर. प्रविण मोरे. ईश्वर उबाळे. रामभाऊ पाटील. नाना आऊचारे.सागर त्रिभुवन. बाळु खरे. संतोष गायकवाड. राजु स्लोदर. राजु सोनवणे. यांच्या स्वाक्षऱ्या आहे