३५ व्या किशोरगट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा मनमाडला येत्या 23 ते 27 फेब्रुवारीला रंगणार थरार…!
३५ व्या किशोरगट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा मनमाडला येत्या 23 ते 27 फेब्रुवारीला रंगणार थरार…!
मनमाड(आवेश कुरेशी):- ३५ व्या किशोरगट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी आमदार सुहास अण्णा चषक स्पर्धा येत्या २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान मनमाड येथे संपन्न होणार असुन या स्पर्धेत जवळपास ८५० पेक्षा जास्त खेळाडू व २५० पेक्षा जास्त पंच व कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक राजेंद्र पगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी मोहनअण्णा गायकवाड, फराण खान,साईनाथ गिडगे, मयूर बोरसे,डॉ शरद शिंदे,पापा थॉमस आदीजन उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कबड्डी अशोषिएशनच्या मान्यतेने व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखली दिनांक २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आमदार सुहास अण्णा चषक ३५ व्या किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद निवडचाचणी कबड्डी स्पर्धा मनमाड येथे संपन्न होणार असुन या स्पर्धेत विदर्भ वगळता राज्यातील ६२ संघाच्या माध्यमातून जवळपास ८५० पेक्षा जास्त खेळाडू व २५० पेक्षा जास्त पंच व कर्मचारी सहभागी होणार आहेत या स्पर्धे दरम्यान जवळपास १०४ सामने होतील व या स्पर्धेतून निवडलेले संघ काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करतील येथील ललवाणी मैदानात या स्पर्धा मॅटवर आयोजित करण्यात आल्या असुन रात्रीच्या वेळी या स्पर्धा संपन्न होणार आहेत प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी उभारण्यात येणार आहे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना मनमाड गुरुद्वारा या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

फोटो कप्शन
मनमाड येथे आयोजित करण्यात आलेल्या ३५ व्या किशोर गट अजिंक्यपद स्पर्धेची माहिती देतांना आयोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र पगारे, यावेळी उपस्थित फराण खान,मोहनअण्णा गायकवाड व इतर( छाया आवेश शेख)