मनमाडला रेल्वे ओव्हरब्रिजची भिंत कोसळली…? अफवामुळे शहरात चर्चेला उधाण…


मनमाडला रेल्वे ओव्हरब्रिजची भिंत कोसळली…? अफवामुळे शहरात चर्चेला उधाण…

मनमाड(अजहर शेख):- मनमाड शहरांतून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गावर असलेल्या रेल्वे ओव्हरब्रिजची भिंत कोसळली काहींनी तर रेल्वे ओव्हरब्रिज कोसळला आशा अफवा पसरवल्या मात्र खरी घटना काही वेगळीच होती मात्र या अफवेमुळे शहरात एकच खळबळ उडाली याशिवाय बघणाऱ्याची गर्दी देखील वाढली यामुळे मात्र मोठयाप्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

Advertisement
                याबाबत सविस्तर माहिती अशी की मनमाड शहरातुन जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गावर असलेला रेल्वेचा एकमेव ओव्हरब्रिज आहे मागील वर्षी या पुलाचा काही भाग कोसळला यामुळे तब्बल चार महिन्यांपेक्षा जास्त हा महामार्ग बंद होता आता काल रात्री एक मोठा कंटेंनर रेल्वेच्या सुरक्षा भिंतीला धडकला यामुळे ही भिंत रेल्वे ट्रॅकच्या बाजूने खाली तिरपी झाली हा सगळा प्रकार सकाळी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आला त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिरपी झालेली भिंत तोडली व तात्काळ नवीन भिंत तयार करण्यास सुरवात केली यावेळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती मात्र शहरात तोपर्यंत रेल्वेचा पूल तुटला अशी अफवा पसरवण्यात आली यामुळे बघ्याची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती रेल्वेच्या प्रशासनाने अगदी काही वेळात युद्धपातळीवर काम करून तिरपी झालेली भिंत तोडली व नव्याने भिंतीचे काम सुरू केले.
भिंत कोसळली नाही कोणत्याही प्रकारचे नुकसान नाही..!
मनमाड शहराच्या दोन्ही बाजूला जोडणारा रेल्वे ओव्हरब्रिज आहे या ब्रिजचा रेल्वे ट्रॅकवर असलेला भाग आहे या भागातील संरक्षण भितीला रात्री कंटेंनरने धडक दिल्याने ती तिरपी झाली मात्र कोसळली नाही या घटनेमुळे रेल्वेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही याशिवाय कोणत्याही प्रकारची जिवीतहानी देखील झाली नाही मात्र तिरपा झालेला भाग धोकादायक होता भविष्यात तो कोसळला असता यामुळे आम्ही तो भाग तोडून नवीन बांधकाम तात्काळ सुरू केले आहे.
रेल्वे प्रशासन अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!