अनाधिकृत नळ धारका विरुद्ध पालीकेची कार्रवाही मुख्याधिकारी चौधरी
अनाधिकृत नळ धारका विरुद्ध पालीकेची कार्रवाही मुख्याधिकारी चौधरी
मनमाड( राजेंद्र धिंगाण):- अनाधिकृत नळ धारका विरुद्ध धडक मोहीम अंतर्गत रमाबाई नगर भारत नगर,डिसोजा मैदान तसेच हनुमान नगर तिवारी वाडी इत्यादी ठिकाणी मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली यावेळेस ज्या नळ धारकांकडे थकबाकी आहे अशा मालमत्ता धारकांचे थेट नळ कनेक्शन बंद करण्यात आले असून त्यांची घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी भरून घेण्यात आली याप्रसंगी सहाय्यक कर निरीक्षक मनोज मगर कर निरीक्षक पुष्पक निकम पाणीपुरवठा प्रमुख किरण आहेर सुभाष केदारे कैलास पाटील अमोल बागुल अरुण दरगुडे पाणीपुरवठ्याचे मुक्तार शेख गाळाभा डेप्रमुख निलेश सपकाळे पाणीपुरवठ्याचे जॉनी जॉर्ज पिंटू वाघ व पाणी पुरवठा कर्मचारी उपस्थित होते_