मनमाड नांदगाव तालुका बीड होतोय का…?
मनमाड नांदगाव तालुका बीड होतोय का…?
Advertisement
मनमाड(आमिन शेख):- बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष सोनवणे यांचा निर्घृण खून झाल्यानंतर बीड जिल्ह्याचा खरा चेहरा समोर आला एरवी गुंडगिरी आणि इतर गुन्हेगारी स्वरूपाचे उदाहरण देतांना बिहार उत्तर प्रदेश सारख्या राज्याचे नाव घेतले जात होते मात्र आता महाराष्ट्र बिहार होतोय का..? त्यातल्या त्यात बीड होतोय का ? अस म्हणायची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आलेली आहे.याला मनमाड नांदगाव तालुका देखील अपवाद राहिला नाही मनमाड नांदगाव तालुका देखील बीड होतोय का..? अस म्हणण्याची वेळ हळूहळू येथील नागरिकांवर येत आहे.याला कारणही तसे आहे येथील तरूणाई ही अमली पदार्थांच्या आहारी गेली असुन छोटया मोठ्या वादाचे रूपांतर आता मोठ्या भांडणात होताना दिसत आहे.नुकताच दोन गटात वाद झाला यातील एक तरुणाने तर चक्क गावठी कट्टा आणुन तुम्हाला संपवून टाकू अशी भाषा केली याची पोलिस दप्तरी नोंद नसली तरी संपूर्ण तालुक्यात चहाच्या दुकानात पण टपरी यासह इतर सर्व ठिकाणी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.पोलिसांनी वेळीच दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा मनमाड नांदगावचा बीड झाल्याशिवाय राहणार नाही अशी भावना येथील नागरिक बोलून दाखवत आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की मनमाड शहर हे रेल्वेचे जंक्शन स्थानक आहे या स्थानकात दररोज शेकडो गाड्याच्या माध्यमातून हजारो प्रवाशी ये जा करतात यात काही गुन्हेगारी स्वरूपाचे देखील असतात त्यातल्या त्यात मोबाईलवर भाईगिरीच्या रील बघुन देखील काहीजण भाई बनण्याची पद्धत अवलंबत आहे.मनमाड शहरात देखील अनेक भाई तयार झाले असुन याला काही राजकीय नेत्यांचा देखील पाठिंबा आहे यामुळे ही टवाळखोर मंडळी शहरात दहशत पसरवण्यात यशस्वी ठरत आहे.नुकताच मनमाड शहरात दोन गटात ऱ्हाडा झाला यात एकाने तर गावठी कट्टा आणुन सरळ तुम्हाला संपवून टाकू अशी धमकी दिली मात्र हे सगळं पोलीस रेकॉर्डला आले नाही मात्र हा सगळा प्रकार चहाच्या दुकानात पान टपरी यासह सार्वजनिक कट्ट्यावर चर्चिला जात आहे.हे सर्व मनमाड शहर व नांदगाव तालुक्यासाठी घातक असुन मनमाड शहरात देखील अमली पदार्थ मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे याबाबत पोलिस यंत्रणा कुठेतरी कमी पडत असुन पोलिसांनी आजच या सगळया। गोष्टीकडे लक्ष दिले नाही तर येथील तरूणाई वाया जाईल मुळात शहरातील जे कोणी रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत त्यांचे कॉम्बिग ऑपरेशन केले तर अनेक गावठी कट्टे मिळून येतील याशिवाय मनमाड शहरातील अमली पदार्थांची विक्रीचे मोठे रॅकेट देखील उघडे होऊ शकते यात अनेक राजकीय नेते देखील सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र शहराला व तालुक्याला गुन्हेगारी क्षेत्रापासुन दूर ठेव्हायचे असेल तर याबाबत ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.आमच्या मनमाड व नांदगावचा बीड होऊ देऊ नका अशी आर्त हाक येथील सुज्ञ नागरिकांकडून मारली जात आहे.
गुन्हेगारी क्षेत्रातील नागरिकांचा घेतला जातोय आदर्श…!शहरातील कॉलेजमध्ये शिकत असणारे तरुण आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण हे सगळे सध्या मोबाईल मध्ये वेडे झाले असुन मोबाईल मधुन विविध रील बघून गुन्हेगारी क्षेत्रातील मातबर असलेल्या नागरिकांना आपले आदर्श म्हणून बघत त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची जणू स्पर्धाच लागली असुन पालकांनी जर वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात पस्तावा करण्याशिवाय पर्याय उरणार नाही यामुळे आपला पाल्य काय करतो कुठे जातो कुणासोबत उठतो बसतो या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा तरच भावी पिढी चांगली निघेल.