मनमाडला एसटी भाडेवाडीच्या विरोधात उबाठा गटाचे चक्काजाम आंदोलन
मनमाडला एसटी भाडेवाडीच्या विरोधात उबाठा गटाचे चक्काजाम आंदोलन
मनमाड (अजहर शेख ):- निवडणुका संपून महिनाभर उलटल्यानंतर महायुती सरकारने एसटी भाडेवाढ केली असून या भाडेवाडी चा फटका अर्धे तिकीट असणाऱ्या महिलांना देखील बसला असून या भाडेवाडीमुळे सर्वसामान्य जनतेला आपली हक्काची वाटणारी लाल परी आता नकोशी वाटत आहे या भाडेवाडीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले मनमाड बस आगारात देखील या आंदोलन करण्यात आले यावेळी महायुती सरकारचे विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना एसटी बस प्रवासात अर्धे भाडे केले होते राज्यात पुन्हा महायुतीच सरकार आले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री झाले या सरकारने लागलीच नवीन नवीन निर्णय घेण्यास सुरुवात केली असुन महायुतीच्या सरकारने आता एसटीच्या दरात भाववाढ केली असुन यामुळे ज्या महिलांना अर्धे भाडे होते त्यांना देखील या भाडेवाढीचा फटका बसला असुन या भाडेवाढीमुळे महिलांमध्ये नाराजी पसरली असुन सर्वसामान्य जनतेला देखील या भाडेवाढचा फटका बसला आहे यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.आज मनमाडला देखील बस आगारात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.यावेळी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी आगरप्रमुख यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.निवेदनावर सुनील पाटील जिल्हा समन्वयक, गणेश धात्रक जिल्हाप्रमुख ना. ग्रामीण संतोष बळीद जिल्हा उपप्रमुख संजय कटारीया जिल्हा समन्वयक संघटक एड सुधाकर मोरे न्यायविधी मंडळ, अध्यक्ष . संतीष जगताप विधानसभा संघटक . शलेश सोनवणे नांदगाव तालुका सचिव पंडीत सानप शहर उपप्रमुख भय्या घुगे युवासेना योगेश परदेशी माधव शेलार शहरप्रमुख, मनमाह पप्पु परब शिवसेना नेते आदींच्या सह्या आहेत.