मनमाड पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर हजारो लिटर पाणी वाया
मनमाड पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर…! हजारो लिटर पाणी वाया
मनमाड (अझहर शेख ):- मनमाड शहराचा पाणी प्रश्न हा सर्वदूर परिचित असून मनमाड शहराच्या पाणीटंचाईला जेवढे राजकीय नेते जबाबदार आहेत तेवढेच पालिकेचे अधिकारी विशेषता पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी व शहरातील अनेक नागरिक देखील जबाबदार आहेत गेल्या तीन दिवसापासून मनमाड शहरातील रमाबाई नगर भारत नगर श्रावस्ती नगर जनार्दन नगर शांतीनगर या भागात पाणीपुरवठा करण्यात येत आहे मात्र या सर्व भागात अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज असून या लिकेज मधून हजारो लाखो लिटर पाणी वायाला जात आहे याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नागरिकांनी तक्रारी केल्या मात्र कर्मचारी येऊन फक्त बघून जातात काम कोणीही करत नाही यामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचले असून मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे नागरिकांना रस्त्याने चालण्यासाठी देखील जागा उरलेली नाही मुळात मनमाड शहराला पाणी प्रश्न हा कायम भेडसावत असतो पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे हजारो लाखो लिटर जर पाणी वाया जात असेल तर याला जबाबदार कोण भविष्यात आता उन्हाळा लागेल आणि त्यावेळी पुन्हा शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल यास जबाबदार कोण असा सवाल देखील नागरिकांतर्फे करण्यात येत आहे