रस्त्याच्या कामामुळे गौसिया नगर भागातील नागरिकांना त्रास… गटार बंद पडल्याने नागरिकांच्या घरात घुसले घाण पाणी… पालिकेला निवेदन देऊनही होतेय टाळाटाळ…
रस्त्याच्या कामामुळे गौसिया नगर भागातील नागरिकांना त्रास…
गटार बंद पडल्याने नागरिकांच्या घरात घुसले घाण पाणी…पालिकेला निवेदन देऊनही होतेय टाळाटाळ…
मनमाड (आवेश कुरेशी) :- मनमाड शहरातील गौसिया नगर भाग्यलक्ष्मी नगर भागात पालिकेच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामावर टाकण्यात आलेल्या रॉ मटेरियल मुळे गटारी बंद पडले आहे या गटारी बंद झाल्यामुळे सांडपाणी हे घरात घुसत असून यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत पालिकेला 13 जानेवारी 20 जानेवारी या दोन्ही दिवस निवेदन देण्यात आले आहे मात्र पालिकेच्या वतीने अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही यामुळे येथील नागरिकाचा पालिकेच्या विरोधात उपोषण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती येथील स्थानिक रहिवाशांनी दिली आहे




याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या गोसिया नगर भाग्यलक्ष्मी नगर या भागातील रस्त्यांचे काम सुरू आहे ठेकेदाराकडून रस्ते बनवण्यासाठी टाकण्यात आलेले रॉ मटेरियल हे ने आन करण्यासाठी मोठमोठे डंपर वापरण्यात आले यामुळे येथील गटारी फुटल्या आहेत तर अनेक ठिकाणी रॉ मटेरियल गटारीत पडल्यामुळे गटारी चोकोप होऊन या भागातील अनेक नागरिकांच्या घरात सांडपाणी घुसत आहे यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पालिकेला 13 जानेवारी 20 जानेवारी या दोन्ही दिवस निवेदन देऊन तक्रार निवारण करण्यासाठी विनंती करण्यात आली मात्र पालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात न आल्याने नाईलाजाने येथील नागरिक आता पालिकेच्या विरोधात उपोषण करणार असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांतर्फे देण्यात आली असून येथील नागरिक तौसीफ पठाण यांनी पालिकेच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली असून आज सायंकाळपर्यंत आमचा प्रॉब्लेम सॉल झाला नाही तर आम्ही पालिकेचे विरोधात उपोषण करणार असून याबाबत आम्ही पोलीस स्टेशन व पालिकेला पत्र देखील दिले आहे जर पालिकेला आम्ही वेळोवेळी टॅक्स भरतो मग सुविधा देण्याचे काम पालिका का करत नाही येथे काम करणारे सफाई कर्मचारी हे कायम टाळाटाळ करत असतात पालिकेचे अधिकारी देखील आमच्या अर्जाला केराची टोपली दाखवत असून पालिका आमच्या परिवारातील कोणी आजारी पडून मेल्यानंतर दखल घेईल का असा संतप्त सवाल देखील पठाण यांनी केला आहे