मनमाड आगारप्रमुखाच्या विरोधात बसपाचे धरणे आंदोलन…!


मनमाड(आवेश कुरेशी):- मनमाड बस स्थानकात काम सुरु आहे मात्र प्रवाशांना याची गैरसोय होऊ नये म्हणून आगार व्यवस्थापक यांनी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे असताना मनमाड बस स्थानक आगरप्रमुख विक्रम नागरे  हे मनमानी कारभार करत असुन त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे महिलांना उघड्यावर सौचास बसण्याची वेळ आली असुन याविरोधात बहुजन समाज पार्टीतर्फे दोन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले असुन आगरप्रमुख हे कोणालाही जुमानत नसुन आपल्या मनमानी कारभार त्यांनी सुरूच ठेवला आहे.आज आंदोलनकर्ते व एसटी चे अधिकारी कर्मचारी यांच्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता.मात्र जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली आहे.
                     मनमाड बस आगाराचे नूतनीकरण काम सुरू आहे यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशी व महिलांना मुबलक सुविधा देणे बंधनकारक असतांना आणि याबाबत काही दिवसांपूर्वी निवेदन देऊनही मनमानी कारभार करणाऱ्या आगरप्रमुख विक्रम नागरे यांच्या विरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने दोन दिवसांपासुन धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असुन आज आंदोलनाचा दुसरा दिवस होता आज एसटी अधिकारी व कर्मचारी यांच्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली आहे.याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील सूचना केल्या आहेत त्यांनी निर्णय घ्यावा नाही तर भविष्यात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल व यास सर्वस्वी एसटी महामंडळ जबाबदार असेल असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. आंदोलनात बहुजन समाज पार्टी नांदगाव विधानसभा तथा मनमाड शहर युनिट प्रविण प्रविण डी पगारे बहुजन समाज पार्टी नांदगाव विधानसभा अध्यक्ष. एस एम भाले  सभासद. दिपक गायकवाड नांदगाव वि उपाध्यक्ष. एजाजभाई शेख. विकास लहिरे  नांदगाव विधानसभा महासचिव. बाळु खरे बि व्ही एफ. प्रविण मोरे. बाळा आहिरे.. विशाल पाटील. संतोष गायकवाड. संजय साबळे. कैलास खडताळे. सोमनाथ लहिरे. पंडित लहिरे.बाळा जगताप. आदींचा धरणे आंदोलनात सक्रिय सहभाग आहे  तसेच आज आंदोलन प्रसंगी ३०० नागरीकांनी आगार व्यवस्थापनाचा निषेध म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आंदोलनाला पाठिंबा दिला अल्ताफ शहा (छप्पर बंद समाज. अध्यक्ष) गुरू निकाळे  रिपब्लिकन पक्ष तालुका अध्यक्ष. मोनिष चाबूक स्वार. (सामाजिक कार्यकर्ते.) बाळु खरे (सामाजिक कार्यकर्ते.) अमोल लंंकेश्वर (सामाजिक कार्यकर्ते) बाळा ढोले.(सामाजिक तथा टि आय कार्यकर्ते )प्रविण चौधरी (सामाजिक कार्यकर्ते) सोनू भाऊ पगारे आदींनी पाठिंबा दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!