महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भूमिअभिलेखचा मुश्ताक शेख पाचवा…!
महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भूमिअभिलेखचा मुश्ताक शेख पाचवा…!
मनमाड(प्रतिनिधी);- महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन व नाशिक जिल्हा हौशी संघटना यांचे सौजन्यने नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित महाराष्ट्र राज्य स्तरीय स्पर्धेत 85 किलो खुल्या वजनी गटात नाशिकच्या भूमिअभिलेख कार्यलयात काम करणाऱ्या मुश्ताक शेखला पाचवा क्रमांक मिळाला असुन नाशिक जिल्ह्यातील एकमात्र खेळाडूला मुश्ताकच्या रूपाने पारितोषिक मिळाले आहे. याबद्दल मुश्ताकचे सर्वत्र कौतुक होत असुन 26 जानेवारी रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी मुश्ताक पात्र ठरला आहे.





महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन व नाशिक जिल्हा हौशी संघटना यांचे सौजन्यने नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी महाराष्ट्र राज्य स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धा आयोजित करण्यात येतात यावर्षीही या स्पर्धा वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहात मोठया उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत राज्यभरातूंन खेळाडू यांनी सहभाग नोंदवला होता नाशिक जिल्ह्यातील भूमिअभिलेख मध्ये कार्यरत असलेला मुश्ताक शेख याने या स्पर्धेत 85 किलो वजनी गटात सहभागी होऊन पाचवा क्रमांक पटकावला आहे त्याला मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी सर्टिफिकेट व मेडल देऊन गौरविण्यात आले आहे मुश्ताक हा या स्पर्धेत नाशिकमधून एकमेव खेळाडू असून ज्याला बक्षीस मिळाले आहे मुश्ताकच्या या कामगिरी बद्दल सर्वत्र कौतूक करण्यात येत असुन येत्या 26 जानेवारी रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र श्री या स्पर्धेत मुश्ताक सहभागी होणार आहे.