१९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे जेष्ठ साहित्यीक डॉ वासुदेव मुलाटे यांच्याहस्ते उद्घाटन…!
१९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे जेष्ठ साहित्यीक डॉ वासुदेव मुलाटे यांच्याहस्ते उद्घाटन…!
छत्रपती संभाजी नगर( प्रतिनिधी):- छत्रपती संभाजी नगर येथे होणाऱ्या १९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यलयाचे उद्घाटन जेष्ठ साहित्यीक व अमळनेर येथे झालेल्या १८ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ वासुदेव मुलाटे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राज्य संघटक किशोर ढमाले, प्रा प्रतिभा आहिरे, प्रा रामप्रसाद तौर, उपाध्यक्ष कॉ अर्जुन बागुल प्रा विलास बुवा वजीर शेख आदींसह इतर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यंदाचे १९ वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य छत्रपती संभाजी नगर येथे २१,२२,२३ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती संभाजी नगर येथे पार पडत आहे या संमेलनाचे कार्यालयाचे आज उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मान्यवर उपस्थित होते. यंदाही वैचारिक मेजवानी या संमेलनात मिळणार आहे.