मनमाडला मुस्लीम लायब्ररी मध्ये वाचन संकल्प दिवस साजरा
मनमाडला मुस्लीम लायब्ररी मध्ये वाचन संकल्प दिवस साजरा
मनमाड(आवेश कुरे4):- वाचाल तर वाचाल या म्हणीचा खरा अर्थ विद्यार्थ्यांना समजावा व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने मनमाडच्या मौलाना आझाद रोडवरील मुस्लीम लायब्ररी मध्ये वाचन संकल्प दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना कथा काव्य वाचन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणुन ईकरा हायस्कूलचे चेअरमन डॉ ए जी कुरेशी व प्रमुख पाहुणे म्हणून हाजी जानी सेठ नजमुल हुसेन मनसुरी हाजी नजीर पठाण होते या कार्यक्रमा चे प्रस्तावीक वाचनालयाचे सेक्रेटरी. अब्दुल कादर भाई यांनी केले यावेळी ईकरा हायस्कूल चे मुख्याध्यापक अफजल सर व रफत मॅडम बिल्कीस मॅडम यांनी आलेल्या विद्यार्थ्यांना काव्य कथन वर मार्गदर्शन केले व काव्य कथनचे उदाहरण देऊन माहीती दिली वाचनावर मार्गदर्शन केले वाचनाची आवड करून घ्यावी वाचनाने बाहेरील जगाचे ज्ञान मिळते असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले यावेळी वाचक वर्ग व प्रायमरी स्कूलचे विद्यार्थी उपस्थीत होते
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एम सलीम अहेमद यांनी केले व सेक्रेटरी कादर भाई आभार व्यक्त केले.
