ओबीसी म्हणजे आदर बॅकवर्ड कास्ट नव्हे तर आदर बॅकवर्ड क्लास : शब्बीर अन्सारी


मनमाड (प्रतिनिधी) :- भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे प्रत्येकाने आपल्या घरात आणले पाहिजे व लहान पासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी ते वाचलं पाहिजे कारण एससी एसटी ओबीसी यासह इतर सर्वांनाच न्याय देण्याचे काम हे भारतीय संविधानाने केलेले आहे ओबीसी म्हणजे आदर बॅकवर्ड कास्ट नव्हे तर आदर बॅकवर्ड क्लास अर्थात इतर मागास प्रवर्ग असा असून ओबीसी मध्ये मोडणारे सर्वच घटक मात्र हे समजू शकले नाही हे मोठं दुर्दैव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप कष्ट करून कलम 340 लागू केले आहे व कलम 340 नुसार इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसींना न्याय देण्याचं काम केलेलं आहे मात्र भारतीय घटना कोणीही समजून घेत नाही ती समजणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे संस्थापक अध्यक्ष हाजी शब्बीर अहमद अन्सारी यांनी व्यक्त केले मनमाड येथे फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष फारुख बागवान तुला तालुकाध्यक्ष दादाभाई गुफरान अन्सारी मंच अध्यक्ष मिर्झा अहमद बेग कार्याध्यक्ष फिरोज शेख डॉ फहीम कुरेशी उपस्थित होते
                 यावेळी शब्बीर अन्सर यांनी आपल्या भाषणातून अनेक मुद्द्यावर भाष्य केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 340 नुसार ओबीसीसाठी आरक्षण केले मात्र ज्या मुस्लिमांना व इतर ओबीसींना या आरक्षण मिळाले पाहिजे होते ते देण्यासाठी खूप मोठा लढा द्यावा लागला हा लढा लढताना मुस्लिम समाजाचा इतर ओबीसी लोकांनी माझ्यावर हल्ले देखील केले मात्र मी ही लढाई सुरूच ठेवली 45 वर्षापासून मी ओबीसींच्या हक्कासाठी लढत आलो आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील ओबीसीची लढाई लढण्यासाठी एससी एसटी तसेच इतर समाजाने मदत केली मनमाड हा चळवळीचा बालेकिल्ला आहे इथे मोठ्या प्रमाणावर एससी एसटी ओबीसी आहेत या ओबीसींना न्याय देण्यासाठी आता संघटन करून लढण्याची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलीप कुमार यांना तुमच्या समाजासाठी तुम्ही लढलं पाहिजे अशी विनंती केली यासह इतर अनेकांनी दिलीप कुमार यांच्याकडे मागणी केली मात्र त्यांनी त्याला सपशेल नकार दिला. मात्र दिलीप कुमार यांना मी जाऊन भेटलो व सर्व गोष्टी समजावून सांगितल्या दिलीप कुमार यांनी त्या गोष्टीचा अभ्यास करून मग आमच्या सोबत लढण्यासाठी साथ दिली या लढ्यामुळेच भारतातील सर्वात कमी वयाचा आयएएस अधिकारी हा तेली समाजाचा मुलगा बनू शकला फक्त आणि फक्त ओबीसीमुळे ओबीसींसाठी मी संपूर्ण भारतभर फिरलो आहे कोणी जर ओबीसीचा नेता आहे असं म्हणत असेल तर ते खोटं आहे अखिल भारतीय समता परिषद देखील मान्यता प्राप्त नाही मात्र ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन ही एक मात्र ओबीसी संघटना शासनमान्य आहे आणि नांदगाव तालुक्यात आज पासून फिरोज शेख हे या संघटनेचे अधिकृत तालुका अध्यक्ष आहेत यापुढे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी इतरांनी त्यांना मदत करावी एवढेच मी सांगू शकतो असे अन्सारी यांनी म्हटले यावेळी फिरोज शेख यांना नियुक्तीपत्र देण्यात आले या कार्यक्रमास नगरसेवक मुस्ताक कुरेशी लियाकत शेख सादिक पठाण इरफान मोमीन हाजी रफिक बाबूजी हाजी शफी यांच्यासह इतर मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते मनमाड शहरातील नगरपालिका कर्मचारी रविंद्र थोरे यांचे चिरंजीव हे सीए परीक्षेत नासिक जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन विलास अहिरे विनोद अहिरे इस्माईल पठाण सद्दाम अत्तार यांच्यासह इतर मान्यवरांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!