राष्ट्राच्या विकासात युवक हा आधारस्तंभ- प्रा.सुरेेश नारायणे
राष्ट्राच्या विकासात युवक हा आधारस्तंभ- प्रा.सुरेेश नारायणे
नांदगाव (महेश पेवाल):- कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,नांदगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तराच्या श्रमसंस्कार शिबिरात आज ‘आजचा युवक व नीतिमूल्ये’ या विषयावर व्याख्यान प्रा.सुरेश नारायणे यांचे आयोजित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्राच्या विकासात विद्यार्थी हा आधारस्तंभ असल्याने त्यांनी आपल्या जीवनात उच्च नीतिमूल्यांचा अंगीकार कराण्याचे आवाहन केले.युवकांनी मोबाईलचा व तंत्रज्ञानाचा चांगल्या गोष्टींसाठी वापर करावा. व्यसनाधिनता टाळावी. पौष्टिक आहार घ्यावा. समाजात वावरतांना सामाजिक भान ठेवून नितीन मुद्द्यांची जोपासना करावी. विवेकशीलता जपावी. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा. श्रमप्रतिष्ठेला महत्त्व द्यावे. युवकाच्या जीवनाशी संबंधित विविध विषयांवर त्यांनी व्याख्यानात सखोल मार्गदर्शन केले.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एन. भवरे यांनी नारायणे सरांचे स्वागत केले. सदर प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. आर.एन.भवरे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.पी.एम. आहेर, प्रा.बी.वाय.आहेर, सहा. कार्यक्रमाधिकारी प्रा.एस.सी.पैठणकर, प्रा.श्रीमती एस.ए.लोखंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस.एस कार्यक्रमाधिकारी प्रा.बी.के.पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.एस.जी.पवार यांनी केले. सदर व्याख्यानासाठी शिबिरार्थी विद्यार्थी उपस्थित होते.