महाराष्ट्राचा बिहार होतोय का : ऍड सुधाकर मोरे
मनमाड(प्रतिनिधी):- महाराष्ट्राचा बिहार होतेय का,परभणीच्या संविधान प्रतिकृती विटंबनेची शासनाने गंभीर दखल घ्यावी. दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे एका माथेफिरुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची काच फोडून विटंबना केली, त्याबद्दल जमावाने त्यास चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात पण दिले, सदरची घटना अत्यंत निदनीय आहे ,त्याचा आम्ही पण निषेध करतो.परंतु फुले,शाहू व आंबेडकरांच्या विचाराने अभिप्रेत असलेल्या या महाराष्ट्रा मध्ये अश्या प्रकारे गैरकृत्य करून जातीय हिंसा निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल नक्कीच ” महाराष्ट्राचा बिहार होतोय का” अशी शंका उपस्थित होत आहे.त्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुन्हेगारी विरुद्ध कडक व गंभीर स्वरूपाचे पाऊल उचलले पाहिजे,सध्या महाराष्ट्रा मध्ये गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही,खुले आम खून अपहरण,अत्याचाराच्या घटना होत आहे,परंतु बरेच गुन्हेगार आजही मोकाट आहेत,गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घेणे अपेक्षित आहे अन्यथा या संतांच्या व महापुरुषांचा वारसा असलेल्या महाराष्ट्राचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही. परभणीच्या या घटनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या निंदनीय घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो व शासनाने अटक केलेल्या आरोपी विरुद्ध लवकरात लवकर तपास करून कोर्टात प्रकरण पाठवून आरोपीस शिक्षाच होईल या दिशेने पाऊल उचलावे जेणे करून आरोपीस पळवाटा शोधण्यास वेळ मिळणार नाही. ऍड–सुधाकर मोरे,जिल्हाप्रमुख विधी व न्यायसेना,नासिक जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष,व मा.अध्यक्ष मनमाड वकील संघ.