देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच मनमाडला कार्यकर्त्यांनी केला जल्लोष…
देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच मनमाडला कार्यकर्त्यांनी केला जल्लोष…
मनमाड(अजहर शेख):- गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आज महायुतीतर्फे अर्थात भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली शपथविधी पार पडताच मनमाड भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी ढोल पथक पेढे वाटप करून भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला येथील एकात्मता चौकात भाजपचे मनमाड शहराध्यक्ष संदीप नरवडे यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष करण्यात आला यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी आज शपथ घेतली आज मुंबई येथील आझाद मैदानात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच मनमाड शहर भाजपा च्या वतीने शहराध्यक्ष संदीप नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली एकात्मता चौकात जल्लोष करण्यात आला ढोल ताशे फटाक्यांची अतिवाजी व मिठाईवाटप करून हा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली यावेळी भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नारायण पवार भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी,भाजपा जेष्ठ नेते नीलकंठ त्रिभुवन, भाजपा जिल्हा चिटणीस नितीन परदेशी, एकनाथ बोडखे, सौ अनिता इंगळे भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ सोनीताई पवार भाजपा जिल्हा बेटी बचाव बेटी पढाव प्रमुख सौ स्वाती ताई मुळे, भाजपा महिला मोर्चा शहर अध्यक्ष सौ स्नेहल भागवत, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर, मन की बात प्रमुख दिपक पगारे,शहर सरचिटणीस गौरव ढोले सप्तेश चौधरी,, नाजीमा अन्सारी, शाहीन शेख,भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष मुकुंद एळींजे, शहर उपाध्यक्ष गणेश कासार, नंदाताई सुरडकर, कैलास देवरे शोभाताई काळे,बिजला बाई निरभवणे,भूषण शर्मा,नगमा पठाण, हिना बागवान, मेहरुंनिस्सा शेख,, मनीष जैस्वाल, सर्वेश जोशी राज परदेशी,गोविंद सानप कुलदीपसिंग चोटमुरादी धीरज भाबड, किरण उगलमूगले, अमित सॊनवणे विलास पगारे संजय गांगुर्डे अविनाश पगारे रमेश मोरे सोनू सोनावाला मनोज जंगम कैलास देवरे, आशिष चावरिया,आदी भाजपा शिवसेना आर पी आय महायुती च्या मान्यवर पदाधिकाऱ्यां सह कार्यकर्ते हितचिंतक व नागरिक मोठया संख्येने उपास्थित होते या विजय जल्लोष कार्यक्रमाचे संयोजन भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले.
शिवसेना शिंदे गटातर्फे जल्लोष…!आज मुंबई आझाद मैदान येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री म्हणून अजित (दादा) पवार यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा संपन्न झाल्याबद्दल आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे आतिश बाजी करून व मोठ्या प्रमाणात घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल हांडगे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, नगरसेवक मिलिंद उबाळे, युवासेना शहरअधिकारी योगेश इमले, संजय घुगे, कैलास गोसावी, सागर शिरसाठ, लाला नागरे, सुनील ताठे, मनू शेख, धनंजय दरगुडे, सनी पगारे, सागर आव्हाड, स्वराज वाघ, सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे उपस्थित होता