शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय खतांचा वापर करून शेती करावी ; देविदास मार्कंड
शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय खतांचा वापर करून शेती करावी ; देविदास मार्कंड
भार्डी( अजहर शेख):- शाश्वत उत्पादन व दोन पैसे पदरात पाडायचे असतील तर शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय खतांचा वापर करून शेती करावी यामुळे उत्पादन जरी कमी असले तरी ते शाश्वत असेल व यातुन दोन पैसे शेतकऱ्यांना मिळतील याची खात्री असते आणि यासाठी आपल्याकडे असलेल्या शेतीच्या निम्मा भाग तरी सेंद्रिय खते वापरून शेती करावी जेणेकरून भविष्यात देखील आपली जमीन आपल्याला व आपल्या मुलांना उत्पादन देऊ शकेल अन्यथा पूढील दहा वर्षात शेतकऱ्यांनी शेती विसरुन जावी असे मत भार्डी ग्रामपंचायतचे माजी सरपंच व प्रगतशील शेतकरी देविदास मार्कंड यांनी व्यक्त केले ईस्ट वेस्ट कंपनी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते यावेळी मंचावर कंपनीचे ऍड मॅनेजर मंगेश पाटील सहाय्यक कृषी अधिकारी शालीकराम करनर नांदगाव तालुक्यातील पत्रकार आमिन नवाब शेख,अजहर शेख ,सूर्यभान हाके,अंबादास गुरुजी कडनर, दत्तू नाईकवाडे, बापू मार्कण्ड शिवाजी सरोदे,यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मार्कंड म्हणाले की दिवसेंदिवस शेती ही अत्याधुनिक नावाच्या खाली धोकादायक होत चालली आहे उत्पादन वाढीसाठी भरमसाठ रासायनिक खतांचा मारा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध औषधांची फवारणी यामुळे जमिनीची पत ढासळत चालली असुन आज तुम्ही आम्ही जे पिकवतो आहे ते विष आहे यामुळे भविष्यात आपल्या मुलांना आपण शेतीच्या नावाखाली फक्त नापिक असलेली जमीन देऊ यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही शेतकऱ्यांनी अत्याधुनिक नावाच्या खाली सुरू असलेल्या शेतीला फाटा देत सेंद्रिय खतांकडे वळावे व कमी पण शाश्वत उत्पादन करून आपले होणारे आर्थिक नुकसान टाळावे यासह जमिनीची पत देखील राखण्यासाठी मदत होईल असे मत व्यक्त केले तर ईस्ट वेस्ट कंपनीचे मंगेश पाटील यांनी त्यांच्या कंपनीच्या वतीने फळभाज्यांचे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पादन देणाऱ्या विविध बियाणे उपलब्ध असल्याचे सांगितले तर आम्ही कांद्याचे प्राप्ती नावाचे हायब्रीड बियाणे बाजारात आणले असुन ते इतरांच्या तुलनेत महाग असले तरी त्याचे उत्पादन शाश्वत आहे आणि आपल्याला आपला झालेला खर्च मिळेलच मात्र फायदाही होईल असे मत व्यक्त केले.यावेळी कृषी अधिकारी करनोल यांनी सरकार तर्फे सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यात आले असुन यासाठी प्रोत्साहन भत्ता देखील उपलब्ध करून दिला आहे प्रामाणिक सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना गट करून त्यांचा माल परदेशात पाठवून देण्याची व्यवस्था केली असुन त्यांना इथे जर 40 रुपये किलो मिळत असेल तर तो तिथे 500 रुपये किलो भाव मिळेल यामुळे आता शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गटशेती करावी असे आवाहन केले आहे.या शेतकरी मेळाव्यात ईस्ट वेस्ट कंपनीच्या प्राप्ती या कांद्याचे देविदास मार्कंड यांनी घेतलेले यशस्वी उत्पादन ठेवण्यात आले होते सेंद्रिय खतांचा वापर करून या कांद्याचे यशस्वी उत्पादन घेण्यात आले असल्याचे मार्कंड यांनी सांगितले. यावेळी पंचक्रोशीतील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.