मनमाड इंदुर महामार्गावर अतिरिक्त वाहतूक पोलीस नेमावा रिपाइंची मागणी…!
मनमाड इंदुर महामार्गावर अतिरिक्त वाहतूक पोलीस नेमावा रिपाइंची मागणी…!
मनमाड(प्रतिनिधी):-मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदुर-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते शहरातील वाहतूक तसेच बाहेरून येणारी वाहतूक यामुळे ही वाहतूक होते ही वाहतूक कोंडी सुटावी यासाठी नेमून देण्यात आलेले पोलीस कर्मचारी कमी पडत आहे यामुळे इथे अतिरिक्त पोलीस नेमणूक करावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी पोलीस निरीक्षक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मनमाड शहरातुन जाणारा इंदुर पुणे महामार्ग हा सर्वात व्यस्त महामार्ग आहे या महामार्गावर मनमाड शहरातील तसेच इतर राज्यातील लहान मोठ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर रीघ लागलेली असते याशिवाय चांदवड महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे याठिकाणी अनेक शेतकरी शेतीमाल विकण्यासाठी येतात यामुळे या महामार्गावर कायम वाहतूक कोंडी होत असते ही वाहतूक कोंडी सुटावी व नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस नेमले आहेत मात्र हे पोलीस ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कमी पडत आहेत यामुळे या ठिकाणी अजून अतिरिक्त पोलिसाची नेमणूक करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी पोलीस निरीक्षक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.