आकाश भाबड यांचा ऐतिहासिक जागतिक 10 वा विश्वविक्रम
नवी दिल्ली (प्रतिनिधी):-भाबड इंटरनॅशनल पब्लिकेशन चे संस्थापक आकाश भाबड व त्यांच्या टिमने उपक्रमाअंतर्गत एक ऐतिहासिक विश्वविक्रम केला आहे दिल्ली मध्ये भव्य समारंभात आकाश भाबड यांना त्यांच्या शिक्षण ,प्रशिक्षण, आणि प्रकाशन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठीत “रेक्स कर्मवीर ग्लोबल फेलोशिप आणि कर्मवीर चक्र पुरस्कार (2024-2025)’ प्रदान करण्यात आला हा पुरस्कार icongo आणि संयुक्त राष्ट्र(un) यांच्या सहकार्याने दिला जातो जो समजात खऱ्या अर्थाने बदल घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करतो
आकाश भाबड ज्यांचे 9 जागतिक विश्व विक्रम आहेत यांनी शिक्षण, प्रशिक्षण आणि प्रकाशन क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे त्यांच्या पुस्तक प्रकाशन आणि प्रशिक्षण उपक्रमांना असंख्य लेखक आणि शिक्षकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली आहे त्यांचे कार्य समाजासाठी एक सकारात्मक बदल घडविण्यासाठी समर्पित आहे आणि हा पुरस्कार त्यांना त्यांच्या अथक प्रयत्नाची पावती म्हणून मिळाला आहे
पुरस्कार स्वीकारताना आकाश भाबड म्हणाले ” हा पुरस्कार माझ्यासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा स्रोत आहे शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा माझा प्रयत्न आहे’