भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर याची महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन अंडर 14 सुपर लीग स्पर्धेत निवड
भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर याची महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन अंडर 14 सुपर लीग स्पर्धेत निवड
मनमाड(आवेश कुरेशी):- बुधवार 27 नोव्हेंबर2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 14 जिल्हास्तरीय क्रिकेटस्पर्धा छ. संभाजीनगर येथे नुकत्याच खेळवल्या गेल्या ज्यामध्ये मनमाडमधील खेळाडु खुशाल परळकर याने मनमाडचे नेतृत्व नंदुरबार जिल्हासंघात केले. या स्पर्धेत खुशालने नंदुरबार अंडर 14 संघासाठी खेळताना उत्तम असे प्रदर्शन केले. विविध जिल्ह्याविरुध्द खेळताना खुशालने एक अर्धशतकाच्या जोरावर 144 धावा व केल्या तसेच गोलंदाजीत 15 बळी स्पर्धेत मिळवले. आपल्या या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर मनमाड मधील हा खेळाडु महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशनच्या सुपरलीग अंडर 14 संघासाठी निवडला गेला आहे. महाराष्ट्र संघात आपली जागा बनवण्यासाठी खुशाल हे सामने पुणे येथे खेळणार आहे.
आपल्या चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशनच्या अंडर 14 वयोगटासाठी सुपरलीग स्पर्धेसाठी खेळणारा खुशाल हा मनमाडमधील प्रथमच खेळाडु ठरला आहे. या आगोदर रुषी शर्मा ( अंडर 16 , अंडर 19 ) व महिला खेळाडु साक्षी शुक्ला ( अंडर 19 ) या खेळाडुंनी नंदुरबार संआसाठी खेळताना मनमाड शहराचे नेतृत्व सुपरलीग स्पर्धेत केले आहे.
या प्रदर्शनासाठी मनमाडमधील या नवोदित खेळाडुची प्रशंसा केली जात असुन या निवडीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
सुपरलीग या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करुन खुशाल याची महाराष्ट्र अंडर 14 संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा त्याला देण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन चे सचिव श्री. युवराज पाटील सर यांनी या खेळाडुला त्याच्या प्रदर्शनासाठी अभिनंदन केले.
मनमाड गुरुद्वारा येथील जथेदार बाबा रणजित सिंग जी व श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे ही विशेष सहकार्य लाभले.
या निवडीबद्दल नांदगाव मतदार संघाचे आमदार श्री. सुहास आण्णा कांदेजी , शिवसेना जिल्हाधिकारि फरहान दादा खान व भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान भाई मोमीन , राजाभाऊ पगारे , श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख, सिध्दार्थ बरडिया , परवेज शेख , मनोज ठोंबरे सर , दक्ष पाटिल, चिराग निफाडकर, रोहीत पवार तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.
या खेळाडुंना मार्गदर्शन सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे लाभले. खुशालला पुढिल निवड सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.