एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये संविधान दिवस मोठया उत्साहात साजरा.
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये संविधान दिवस मोठया उत्साहात साजरा.
मनमाड(अजहर शेख) :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज मध्ये संविधान दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष भूषण दशरथ शेवाळे सर यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन संविधान दिवस साजरा करण्यात आला. शाळेतील उपशिक्षक अनिस खान सर यांनी विदयार्थ्यांचे सामूहिक व वैयक्तिक संविधानातील उद्दिशेकेचे वाचन करुन घेण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे,उपशिक्षक परवेज अहमद काजी, राहुल कडनोर यांनी संविधान दिन साजरा करण्याचा उद्देश व महत्व स्पष्ट केले.तसेच 26/11 च्या हल्ल्यातील शहीद पोलिसांना व जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेच्या सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी,पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर,Sham आरिफ कासम व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक काजी परवेज अहमद यांनी केले. मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे व संस्थेच्या सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.