माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन…! भाजपावर शोककळा..
माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन…! भाजपावर शोककळा..
मनमाड(अजहर शेख):- भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार आमदार हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन झाले नाशिक येथील राहत्या घरी त्यांनी आज पहाटे 6 ते 6 : 30 वाजेच्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला ते ७३ वर्षाचे होते.पेठ – सुरगाणा या आदिवासी मतदारसंघाच्या राजकारणात सुरुवातीला अपक्ष म्हणून उतरलेले हरिश्चंद्र चव्हाण पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून ते एकदा खासदार तर भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ते सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीत ते सुरगाणाचे सदस्य तसेच जिल्हा परिषदेतील विविध पदे त्यांनी भूषवली होती.त्यांचे पार्थिव नाशिक येथील कॉलेजरोडवरील त्यांच्या निवासस्थानी दुपारी एक वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांना ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. चव्हाण यांच्या परिसरात पश्चात नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी सभापती कलावती चव्हाण, मुलगा समीर, मुलगी स्नेहल असा परिवार आहे.