आमच्या मुलांना तडीपारच्या नोटिसा राजकीय दबावाखाली सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांकडून कटकारस्थान ?
आमच्या मुलांना तडीपारच्या नोटिसा राजकीय दबावाखाली
सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांकडून कटकारस्थान ?
मनमाड(आमिन शेख):- आमचे मुलं हे कोणत्याना कोणत्या राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून शहरात काम करत आहेत मात्र ते सत्ताधारी आमदार यांच्याकडे कोणत्याही आमिषाला व दबावाला बळी न पडता आपल्या पक्षाचे प्रामाणिक काम करत आहे याचा डोक्यात राग धरुन पोलिस यंत्रणाना हाताशी धरून आमच्या मुलांना खोट्या गुन्ह्याच्या नावाखाली तसेच ज्या गुन्ह्यांमध्ये कोर्टाने निकाल दिला आहे अशा गुन्ह्यांची यादी करून हद्दपार(तडीपार) नोटिसा बजावण्यात आल्या आहे.मुळात आमच्या मुलांपेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे सत्ताधारी पक्षाचे आमदार सुहास कांदे यांच्यासोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांवर असुन त्यांच्यावर साधी कारवाई न करता सोडुन देण्यात आले आहे हे सर्व राजकीय दबावाखाली सुरू असुन भविष्यात आमच्या मुलांना काही कमी जास्त झाले तर याला आमदार सुहास कांदे व पोलीस प्रशासन जबाबदार असेल अशी आर्त हाक खोट्या तडीपार नोटीस काढण्यात आलेल्या परिवारातील सदस्यांनी केली आहे.यावर निवडणूक आयोग काय भूमिका घेते याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील 92 लोकांना हद्दपार नोटीसा बजावण्यात आल्या असल्याचे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले मात्र ज्यांना ज्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत यातील केवळ 6 ते 7 लोकांना टार्गेट करून नाहक मानसिक त्रास देण्याचा प्रकार सुरू असुन याबाबत नोटीस आलेल्या परिवारातील सदस्यांनी मालेगाव कोर्टात याचिका दाखल केली असुन केवळ 92 ,112 किंवा 200 पेक्षा जास्त लोकांना हद्दपार नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगितले जात आहे मुळात सत्ताधारी आमदार सुहास कांदे यांच्या दबावाखाली आम्हाला नोटिसा देण्यात आल्याचे मत नगरसेवक लियाकत शेख गुरुकुमार निकाळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे आमच्यावर कोणत्याही प्रकारचे गंभीर गुन्हे नसतांना अनेक गुन्ह्यांची कोर्टाने निकाल देऊन निर्दोष मुक्तता केली असताना देखील पोलीस राजकीय दबावाखाली आम्हाला टार्गेट करत आहेत तर आमदार कांदे यांच्यासोबत फिरणाऱ्यावर ऑलरेडी तडीपार सारख्या कारवाई झालेल्या आहेत तसेच त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत तरीही ते मनमाड शहरात राजरोसपणे फिरत आहेत व आमच्या मुलांना हेतुपुरस्सर टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे मुळात सत्ताधारी आमदार यांच्या सांम दाम दंड भेद यापैकी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आमचे मूल आहे त्या पक्षाच्या उमेदवार यांच्यासोबत काम करत आहेत याचा राग धरून ही कारवाई करण्यात आली आहे भविष्यात आमच्या मुलांच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर याला सर्वस्वी आमदार सुहास कांदे व पोलीस प्रशासन जबाबदार असेल आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही निवडणूक झाल्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कार्यलयाबाहेर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा पीडित कुटुंबाच्या सदस्यांनी दिला आहे.
आमदाराना आपल्या केलेल्या कामावर विश्वास नसल्याने कारवाई !आमदार सुहास कांदे यांनी आपण स्वतः केलेल्या विकासाच्या कामावर विश्वास नसल्याने तसेच त्यांना त्यांचा पराजय दिसत असल्याने व इतर पक्षाचे लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांचा जनसंपर्क जास्त प्रमाणात वाढल्याने व ते त्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडत नसल्याने पोलीस प्रशासनाला हाताशी धरून खोट्या गुन्ह्यांची यादी दाखवून हद्दपार करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत मुळात याबाबत आम्ही अपील केली तरी अप्पर पोलीस अधिक्षक यांनी 4 दिवस बसुन ठेवले मात्र निकाल दिला नाही यामुळे आम्ही कोर्टात याचिका दाखल केली आहे.फिरदोस इरफान शेख पीडितेची पत्नीमाझ्या मुलाच्या जीवाला काही झाले तर आमदार व पोलीस जबाबदार..!माझा मुलगा गुरुकुमार निकाळे हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे काम करतो याशिवाय तो रिपब्लिकन पक्षाचे वतीने गोरगरीब जनतेच्या प्रश्नांवर न्याय मिळावा यासाठी लढतो मात्र आमदार कांदे यांना त्याचे काम आवडत नाही किंवा तो त्यांची गुलामगिरी करण्यासाठी तयार नसल्याने कारण नसताना त्याला हद्दपार करण्यासाठी नोटीस बजवण्यात आली आहे भविष्यात माझ्या मुलाच्या जीवाला काही कमी जास्त झाले तर याला आमदार सुहास कांदे व पोलिस प्रशासन जबाबदार असेलसुनंदा निकाळे पीडितेची आई