बटेंगे तो कंटेंगे आणि फिर मिलके लुटेंगे आदित्य ठाकरे यांची योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका…
बटेंगे तो कंटेंगे आणि फिर मिलके लुटेंगे आदित्य ठाकरे यांची योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका…
निमगाव/नांदगाव(अजहर शेख) :- बटेंगे तो कंटेंगे या योगी आदित्यनाथ यांच्या वाक्याचा समाचार घेतांना आदित्य ठाकरे म्हणाले की बटेंगे तो कंटेंगे आणि फिर मिलके लुटेंगे हा भाजपाचा कार्यक्रम आहे याशिवाय एक है तो सेफ है हे मोदीचे वाक्य म्हणजे महाराष्ट्र भाजपापासुन सेफ आहे असे मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नांदगाव मतदारसंघातील निमगाव या ठिकाणी आयोजित प्रचार सभेत व्यक्त केले यावेळी त्यांनी नांदगाव तालुक्यातील गुंडागर्दी घालवायची असेल तर मशाल निशाणीला मतदान करून गणेश धात्रक यांना निवडून द्या असेही ठाकरे म्हणाले यावेळी नागरीकांनी आदित्य ठाकरे यांना हात उंचावून प्रतिसाद दिला.
यावेळीं बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की नांदगाव मतदारसंघात लोकांच्या मनात भीती आहे, कोणी गुंडाची भीती दाखवता आहे मात्र आमच्या कार्यकर्त्यांना हात लावाल तर याद राखा आमचे सरकार येणार आहे बर्फाच्या लादिवर झोपवेल असा ईशारा त्यांनी महाविकास आघाडीच्या समोरील दोन्ही उमेदवारांना इशारा दिला इथे या दोघांचे कार्यकर्ते हे १०० कोटी, २०० कोटीच्या बाता करता आहेत मात्र तुम्हाला सांगणे आहे तुमच्या घरीच दादागिरी करा, आमच्या कार्यकर्त्यावर दादागिरी करू नका महाराष्ट्रात मशाल पेटणार, तुतारी वाजणार, हात दिसणार राज्यात आमचीच सत्ता येणार आहे फक्त दहा दिवस बाकी आहे यानंतर भयमुक्त महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. पन्नास खोके एकदम ओके, यां गद्दाराना आता नॉट ओके करायची वेळ आली आहे.या गद्दारांना तिकीट कोणी दिले, यांना निवडून कोणी आणले हे या गद्दाराना विचारा महाराष्ट्रात महा विकास आघडीचे बहुमताचे सरकार येणार आहे या मिंदे सरकार कडून अन्याय होतोय, भाजप शेतकऱ्यांवर अन्याय करते आहे महा विकास आघाडीच्या सरकार मध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली १५ लाख देणार होते, १५०० रुपये देत आहे १५०० रुपये देऊन , आणि देवा भाऊ देवा भाऊ करत आहेत भाजपला लाज नाही, एकनाथ शिंदेला लाज वाटत नाही.
आम्ही नुसते बोलत नाही, आम्ही करून दाखवतो या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र जाचक अटी लावल्या शेतकऱ्यांवर आपत्ती आली तेव्हा आपले मंत्री नेते गावागावात पोहोचले व मदत केली या सरकारच्या काळात आपत्ती आली, तेव्हा अब्दुल गद्दार आले होते का, आताचे कृषी मंत्री आले का कधी ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.भाजपने मोदीने आजच्या तारखेला नोटबंदी केली या नोटबंदिने मोठे नुकसान केले, आजची महागाई परवडणारी आहे का ?महाराष्ट्रात देशात महागाई वाढत चालले आहे भाजप, एकनाथ शिंदे आज जे वाटत आहे, ते ५० खोके आपल्याला मिळाले पाहिजे आमचे सरकार आल्यास नोकरदार व इतर महिलांना मोफत प्रवास देणार तसेच डाळ, साखर, तेल यांचे भाव स्थिर ठेवणार आम्ही संपूर्ण परिवाराचा विचार करणार आहोत महिलांचा सन्मान केला पाहिजे, भाजप एकनाथ शिंदे हारत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी १५०० रुपयांची योजना आणली आम्ही महालक्ष्मी योजनेद्वारे महिन्याला ३००० रुपये देणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.महाराष्ट्र आपला आहे, स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्या ही आमची भूमिका आहे त्यामुळे महाराष्ट्रात प्रकल्प यावे ते कुठेही दिले तरी चालतील ही आपली भूमिका आहे वेदांता गुजरातला नेले अवकाळी सरकार आमच्या डोक्यावर बसवले बहुमताचे सरकार, भाजप प्रणित सरकार असतांना एकही रोजगार महाराष्ट्रात आणला नाही उद्योग मंत्र्यांना विचारा डांबर धंदा कसा चाललाय असा टोला उदय सावंत यांचे नाव न घेता लगावला. आमचे उद्योग पळवून भाजप गुजरात मध्ये रोड शो करतेय हे सरकार पुन्हा आले तर मंत्रालय देखील गुजरातला पळवतील पोलीस बदलीसाठी पैसे मागतात कायदा सुव्यवस्था ह्या राज्यात आहे का नाही कुठे गेले माहीत नाही गृहमंत्री सुडाची भावना घेवून वागतात इडी, सीबीआय मागे लावतात राज्यात काय चाललय सर्व अस्थिर आहे बदलापूरमध्ये लहान मुलीवर अत्याचार झाला, त्यातील आरोपी शिंदे याला ठार मारले वामन म्हात्रे या शिंदेच्या नेत्याने महिला पत्रकाराला प्रश्न विचारले म्हणून दम दिला असे तुमचे लाडके भाऊ होतील का..?असा सवालही यावेळीं त्यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी स्थानिक उमेदवार सुहास कांदे व समीर भुजबळ यांच्यावर देखील नाव न घेता टीका केली.
एकनाथ शिंदे यांची नक्कल…!
आदित्य ठाकरे यांनीपैसे मिळाले का ? असे विचारले व एकनाथ शिंदे हे जसे दाढी खाजवत पैसे मिळाले तशा पध्दतीने प्रश्न विचारत एकनाथ शिंदे यांची नक्कल केली लाज वाटली पाहिजे आमचे सरकार आल्यावर महालक्ष्मी योजने अंतर्गत ३ हजार रुपये देणार असल्याची देखील ठाकरे यांनी घोषणा केली
फोटो कप्शन
नांदगाव येथील महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत बोलताना युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे गणेश धात्रक व इतर मान्यवर(छाया अजहर शेख).