समीर भुजबळ यांनी बहुजन समाज पार्टी तर्फे उमेदवारी करावी…? नांदगाव तालुका बहुजन समाज पार्टी तर्फे भुजबळ यांना आवाहन
समीर भुजबळ यांनी बहुजन समाज पार्टी तर्फे उमेदवारी करावी…?
नांदगाव तालुका बहुजन समाज पार्टी तर्फे भुजबळ यांना आवाहन
मनमाड( अजहर शेख ):- आगामी विधानसभा निवडणुकीत नांदगाव विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार समीर भुजबळ यांनी बहुजन समाज पार्टी तर्फे उमेदवारी करावी बहुजन समाज पार्टी त्यांचे निश्चित स्वागत करेल तसेच भुजबळ परिवार हा फुले शाहू आंबेडकर विचारधारा जोपासणारा परिवार असून त्यांनी जर बहुजन समाज पार्टी पक्षाची हत्ती ही निशाणी घेतली तर त्यांचा विजयाचा मार्ग सुकर होईल असे खुले पत्र नांदगाव तालुका विधानसभेचे अध्यक्ष प्रवीण पगारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसिध्दीस दिले आहे

बहुजन समाज पार्टी तर्फे तालुकाध्यक्ष प्रवीण पगारे यासह त्यांचे सहकारी यांनी एक खुले पत्र लिहिले असून या पत्रात म्हटले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी खासदार समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करत आहे मुळात भुजबळ परिवार हा फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा जोपासणारा परिवार आहे नांदगाव तालुक्यातील दलित मुस्लिम यासह इतर बहुजन समाजातील मतदारांची संख्या बघता समीर भुजबळ यांनी बहुजन समाज पार्टीची हत्ती ही निशाणी घेतली तर समीर भुजबळ यांचा विजय सुकर होईल मुळात भुजबळ जर बहुजन समाज पार्टीच्या वतीने उमेदवारी करत असतील तर बहुजन समजा पक्ष तसेच इतर बहुजन समाजातील नागरिकनिश्चित त्यांचे स्वागत करतील असे या पत्रात म्हटले आहे या पत्रकावर दीपक गायकवाड नांदगाव विधानसभा सचिव विकास लहिरे गौतम गायकवाड नांदगाव विधानसभा शहराध्यक्ष कैलास गायकवाड महासचिव एजाज शेख विजय रोकडे आदींच्या सह्या आहेत.