नांदगाव -मनमाड विधानसभा मतदार संघात सुहास कांदेंच्या उमेदवारीला विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची अजित पवारांच्या निवासस्थानी धडक


नांदगाव -मनमाड विधानसभा मतदार संघात सुहास कांदेंच्या उमेदवारीला विरोध

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची अजित पवारांच्या निवासस्थानी धडक

जागा राष्ट्रवादीला घ्या किंवा उमेदवार बदला राष्ट्रवादीची मागणी

 

मुंबई(सम्राट वृत्तसेवा): – मनमाड विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदारांच्या उमेदवारीला विरोध वाढत असून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी थेट अजित पवार यांचे निवासस्थान गाठत आपली कैफियत मांडली.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा देण्यात यावी या मागणीसाठी जवळपास ४०० ते ५०० कार्यकर्ते देवगिरी या निवासस्थानी दाखल झाले आहे. नांदगावची जागा राष्ट्रवादीला मिळावी अथवा शिवसेनेने उमेदवार बदलावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.पंरतु, शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार दिला गेला तर त्यांच्या उमेदवाराचे काम करणार नाही, असेही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे..

Advertisement

नांदगाव मनमाड येथील जनता विद्यमान आमदारांना त्रस्त आहे. जनता भयभीत असून जनतेची मागणी आहे की या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लढले पाहिजे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते समीर भुजबळ यांनी लढावे अशी मागणी होत आहे. जनता त्रस्त असताना त्याच व्यक्तीला उमेदवारी देणे चुकीचे आहे. ही मागणी घेऊन
आज नांदगाव- मनमाड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबईत अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली.यावेळी कार्यकर्त्यांनी भुजबळ साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. तसेच कोणत्याही परिस्थिती आपण सुहास कांदेचे काम करणार नाही ,अशी भूमिकाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार, नांदगाव तालुकाध्यक्ष विजय पाटील , मालेगाव तालुकाध्यक्ष रतन हलवर, मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड, कार्याध्यक्ष बाळासाहेब जाधव, नांदगाव शहराध्यक्ष अरुण पाटील, अमित पाटील, राजेंद्र लाटे, आबा साळुंखे, संपत पवार, प्रतापदादा गरुड, दत्तू पवार, नारायण पवार, महेंद्र शिसोदे यांच्यासह ४०० ते ५०० कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!