मनमाडला दादासाहेब गायकवाड जयंती मोठ्या उत्साहात साजरी…!


मनमाड(अजहर शेख):- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत आणि सामाजिक लढ्यात खांद्याला खांदा लाऊन लढणारे माजी खासदार पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मनमाडचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांच्या अध्यक्षतेखाली हा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Advertisement

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा उजवा हात समजले जाणारे, जनमानसातील, दलित चळवळीतील एक महत्वाचे नेते, मुत्सद्दी भारतीय राजकारणी, माजी खासदार तथा माजी आमदार, पद्मश्री, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या १२२ व्या जयंती निमित्त मा.नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले याप्रसंगी दादाभाऊ शार्दुल, प्रदिप शिंदे, अरुण वाघ, बंडू म्हसदे, मोहन खिल्लारे, भरत खरे, अनिल शेजवळकर, संतोष म्हसदे, मनिष साळुंखे, विनोद केदारे, संतोष हुसळे, गौतम गायकवाड, विलास बागुल, गिरिष सोनवणे, आकाश निकम, तसेच सर्व गायकवाड चौकातील रहिवासी व आर.डी.पी.फ्रेंन्डस् ग्रुप चे कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!