नवरात्र उत्सव व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव मध्ये अजय-अतुल यांच्या सांज सुरांची मैफिल संगीताची सोहळ्याचे आयोजन
नांदगाव-मनमाड, मालेगाव मतदारसंघातील नागरिकांना सुप्रसिद्ध गायक अजय-अतुल यांच्या गाण्याची पर्वणी
नाशिक मध्ये प्रथमच अजय-अतुल यांचा गाण्यांचा कार्यक्रम
नवरात्र उत्सव व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव मध्ये अजय-अतुल यांच्या सांज सुरांची मैफिल संगीताची सोहळ्याचे आयोजन
बुधवार,दि.९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एमव्हीपी कॉलेजच्या मैदानावर होणार भव्य दिव्य कार्यक्रम
नांदगाव(महेश पेवाल):- नवरात्र उत्सव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बुधवार, दि.९ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता नांदगाव शहरातील एमव्हीपी कॉलेज मैदान येथे सुप्रसिद्ध गायक अजय-अतुल यांच्या “सांज सुरांची मैफिल संगीताची” या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदगाव तालुकाध्यक्ष विजय पाटील, नांदगाव शहराध्यक्ष अरुण पाटील,,मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड, मालेगाव पूर्व तालुकाध्यक्ष रतन हलवर यांनी केले आहे.
तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविण्यात आहे. त्यानुसार नवरात्र उत्सव व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुप्रसिद्ध गायक अजय-अतुल यांच्या “सांज सुरांची मैफिल संगीताची” या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नांदगाव शहरातील एमव्हीपी कॉलेजच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता हा भव्य दिव्य सोहळा संपन्न होणार आहे.
विशेषतः सुप्रसिद्ध गीतकार गायक अजय अतुल यांचा पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यात गायनाचा भव्य दिव्य कार्यक्रम होत आहे. यामुळे नांदगाव मतदारसंघातील नागरिकांसाठी ही मोठी संधी आणि पर्वणी असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ही संधी नांदगाव मतदारसंघातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांनी बहुसंख्येने या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष विजय पाटील, नांदगाव शहराध्यक्ष अरुण पाटील, मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड, मालेगाव पूर्व तालुकाध्यक्ष रतन हलवर यांनी आवाहन केले आहे.