मनमाडला नगर पालिकेवर महिलांचा टमरेल मोर्चा…! शौचालयाच्या जागी शौचालय बनवण्यासाठी काढण्यात आला मोर्चा..
मनमाडला नगर पालिकेवर महिलांचा टमरेल मोर्चा…! शौचालयाच्या जागी शौचालय बनवण्यासाठी काढण्यात आला मोर्चा..
मनमाड(अजहर शेख):- मनमाड शहरातील राजवाडा,तेली गल्ली रोहिदास वाडा या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांसाठी असलेले सार्वजनिक सुलभ शौचालय नूतनीकरण करण्यासाठी तोडण्याचे काम सुरू केले मात्र पालिकेच्या वतीने ही जागा आता व्यवसायिक गाळे करण्यासाठी वापरण्यात येणार असुन या कामाला स्थानिक नागरिकांच्या वतीने विरोध करण्यात आला असुन ज्या ठिकाणी शौचालय आहे त्या ठिकाणी शौचालय बनवावे यासाठी नगर पालिकेवर महिला व पुरुषांनी डब्बा मोर्चा काढत पालिकेचा निषेध नोंदवला यावेळी पालिकेच्या व मुख्याधिकारी यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.
याबाबत अधिक वृत्त असेकी मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजवाडा, तेली गल्ली, रोहीदास वाडा व पिंपळवाडा, गांधी चौक पाकीजा कॉर्नर येथील सुलभ शौचालय नव्याने बांधणीसाठी जुने जीर्ण झालेले शौचालय तोडण्यात येत आहे. सदरील ठिकाणी फक्त शौचालय बांधण्यात यावे इतर व्यवसायासाठी गाळे बांधण्यात येऊ नये. मुलभुत गरजापैकी इतर महात्वाची गरज म्हणुन शौचालय येते. भारत सरकारने देखील शौचालयास प्राधान्य देऊन घरोघरी शौचालय व सुलभ शौचालय साठी विशेष तरतुद केलेली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदिनी देखील आधी शौचालय मग मंदिर अशी घोषणा केली आहे आणि त्या धर्तीवर काम देखील सुरू आहे.
स्वच्छ भारत अभियानातर्गत जे मनमाड शहरातील सुलभ शौचालय चालु आहे, त्यापैकी पाकीजा कॉर्नर येथे शौचालय हे महत्वाचे व अती नागरी उपयोगाचे आहे. म्हणुन ते त्वरीत बांधण्यात यावे. मनमाड नगर परिषद यांनी स्थानिक नागरिकांचा अंत पाहू नये सदर शौचालयाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करुन शौचालय नागरिकांसाठी उपलब्ध करून दयावे मात्र पालिकेच्या वतीने या ठिकाणी व्यवसायिक गाळे बांधण्यात येत असुन ते या ठिकाणी योग्य नाही या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांना शौचालय मध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होईल महिला व पुरुषांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक शौचालय हे अत्यंत उपयोगाचे असून या सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यावा असे आंदोलन करणाऱ्या महिला व पुरुषांनी सांगितले याबाबत मनमाड शहर पोलीस स्टेशन निरीक्षक विजय करे यांना देखील निवेदन देण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक विजय करे यांनी मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्याशी संपर्क साधून याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले यावेळी सिध्दांत केशव पाटील. करण पाटील. ललित नेरकर. संदेश इप्पर. अमोल. पाटील. कुमार पाटील. आशा बाई पाटील लताबाई पाटील. सकुबाई अहिरे वाल्मिक पाटील यांच्यासह या परिसरात राहणाऱ्या महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.