मनमाड नगर पालिकेच्या जागेचा खाजगी ठेकेदाराकडून गोडावून म्हणून वापर…! पालिका प्रशासन कारवाई करेल का..?
मनमाड नगर पालिकेच्या जागेचा खाजगी ठेकेदाराकडून गोडावून म्हणून वापर…! पालिका प्रशासन कारवाई करेल का..?
मनमाड(विशेष प्रतिनिधी):- नगर पालिका किंवा कोणत्याही शासकीय मालकीची जागा जर भाड्याने घ्यायची असेल तर त्यासाठी मोठ्या प्रोसेसमधुन जावे लागते मात्र मनमाड नगर पालिकेच्या मालकीच्या जागेचा येथील बिल्डिंग मटेरियल सर्रासपणे गोडावून म्हणून वापर करतांना दिसत असुन या ठेकेदारावर पालिका कारवाई करेल का असा सवाल शहरातील जनतेकडून विचारला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मनमाड नगर पालिकेच्या मालकीचे अनेक व्यवसायिक इमारती अर्धवट अवस्थेत पडुन आहेत याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असुन याचा गैरफायदा येथील अनेक बिल्डिंग मटेरियल विकणारे व इतर व्यवसायिक घेत असुन पालिकेच्या गाळ्याचा तसेच मोकळ्या जागेचा चक्क गोडावून म्हणून वापर करताना दिसत आहे असे गाळे किंवा कोणत्याही प्रकारची मोकळी जागा वापरण्याची आधी रितसर परवानगी घ्यावी लागते व त्या वापरलेल्या जागेचा मोबदला पालिकेला अदा करावा लागतो मात्र येथे अस न करता बिल्डिंग मटेरियल विकणारे ठेकेदार थेट या जागेचा गोडावून म्हणून वापर करत आहे संबंधित ठेकेदारावर कारवाई करेल का..? असा सवाल सर्वसामान्य मनमाड कराकडून विचारला जात आहे.