आठवले साहेबांचा फोटो टाळला तर परिणाम वाईट; कपिल तेलुरे रिपब्लिकन पक्षाचा चांदवड तालुका मेळावा संपन्न…!
चांदवड(संजय जाधव):-आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते नामदार रामदास आठवले यांचे फोटो प्रोटोकॉल नुसार पोस्टरवर वापरले पाहिजे तसेच रिपाइच्या स्थानिक प्रतिनिधीना विश्वासात घेऊन निवडणूक लढवाव्या अन्यथा आठवले गटाच्या वतीने वेगळी भूमिका घेऊन उमेदवार दिले जातील असा स्पष्ट ईशारा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस कपिल तेलुरे यांनी दिला चांदवड येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी त्यांनी महायुतीचा घटक म्हणून आम्हाला विश्वासात घेऊनच काम करा अन्यथा परिणामाला सामोरे जा असे सांगितले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले चांदवड तालुका युवकांचा पक्षप्रवेश सोहळा पदग्रहण सोहळा शाखा फलकांचे उद्घाटन सोहळा व संवाद मेळावा शासकीय विश्रामगृह चांदवड या ठिकाणी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या आदेशाने व रिपाइंचे पँथर नेते प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व रिपाइंचे नाशिक ग्रामीण जिल्हा सरचिटणीस कपिल तेलुरे, रिपाईचे चांदवड तालुका अध्यक्ष महाविर संकलेचा, रिपाईचे चांदवड देवळा विधानसभा अध्यक्ष ताराचंद अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, व रिपाइंचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारत जगताप, भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे, उत्तर महाराष्ट्र नेते वंदेश गांगुर्डे, चांदवड शहराध्यक्ष उमेश जाधव, ज्येष्ठ नेते अनिल केदारे, माजी.शहराध्यक्ष रवीभाऊ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित प्रशांत ठाकरे,पंकज राऊत ,राजू पगारे, नाना केदारे, अरुणआत्तार,गणेश साळवे किशोर अहिरे,
शंकर एळींजे,पंकज गोधडे आकाश बनकर, प्रवीण गाडे,
सिद्धार्थ गांगुर्डे, बाबू हिरे ज्योतीताई गरुड, मीनाताई शिंदे,रेखाताई बोढारे
शोभाताई खरे, शिवाजी धुळे, अमोल बेंडके धनगर कानडी तालुका अध्यक्ष, प्रदीप मोरे नांदगाव विधानसभा अध्यक्ष, नामदेव लंबे मराठा आघाडी तालुकाध्यक्ष, संजय मोरे युवा तालुका उपाध्यक्ष, राहुल फटांगरे धनगर आघाडी उपाध्यक्ष, व इत्यादी मान्यवर व कार्यकारणी मोठ्या संख्येने उपस्थित होते