नांदगाव विधानसभा मतदारसंघात खासदार समीर भुजबळ यांचे जोरदार स्वागत…!
नांदगांव विधानसभा मतदारसंघात गावोगावी माजी खासदार समीर भुजबळ यांचे जल्लोषात स्वागत
नांदगांव विधानसभा मतदारसंघात माजी खासदार समीर भुजबळ यांनी उमेदवारी करण्याची नागरिकांची मागणी
पीक विम्यासंदर्भात समीर भुजबळ यांनी साधला कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क ; शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याचे पैसे खात्यात वर्ग
नांदगांव(महेश पेवाल):- नांदगांव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या प्रश्नावर माजी खासदार समीर भुजबळ यांनी इन्शुरन्स कंपनीच्या पुणे येथील व्यवस्थापकांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करत शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर मिळावे याबाबत चर्चा केली. त्यानंतर पुढील तीन दिवसांतच मूळ डोंगरी, जामदरी, कळमदरी परिसरातील मका उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा झाले. यामुळे शेतकऱ्यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांचे आभार मानले.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून नांदगांव विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देण्यात येत आहे. यावेळी नागरिकाकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत असून त्यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी गळ घातली जात आहे.
माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांनी नुकताच साकोरा, न्यू पांजण, कळमदरी, जामदरी, मूळ डोंगरी, चांदोरे, रणखेडा आदी गावांना भेटी दिल्या. यावेळी नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी उपस्थित शेतकाऱ्यांशी संवाद साधला. या प्रसंगी शेतकऱ्यांच्या पीक विमा, विजेच्या तसेच विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी कांदा, मका तसेच कापूस या पिकांच्या पिक विमा मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांना सांगितले. त्यानंतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी तातडीने ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे पुणे येथील व्यवस्थापक यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून चर्चा केली. तसेच मंत्रालयात संबंधित विभागात देखील संपर्क करत माहिती घेतली. अर्थ खात्यातून अनुदान प्राप्त होताच आठ दिवसांत उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल असे उपस्थित शेतकऱ्यांना माजी खासदार समीर भुजबळ यांनी आश्वस्त केले.या प्रसंगी नांदगाव तालुका अध्यक्ष विजय पाटील, नांदगाव शहर अध्यक्ष अरुण पाटील, दादाभाऊ पगार,आबासाहेब इनामदार, देवदत्त सोनवणे, अशोक पाटील, प्रसाद सोनवणे, राजेंद्र लाठे, विश्वास अहिरे, योगेश पाटील, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.