माझी वसुंधरा ४.० मध्ये चांदवड नगरपरिषदेला तिसरा क्रमांक दोन कोटींचे बक्षिस जाहीर…!


माझी वसुंधरा ४.० मध्ये चांदवड नगरपरिषदेला तिसरा क्रमांक दोन कोटींचे बक्षिस जाहीर…!

चांदवड(राजेंद्र धिंगाण):- राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत स्पर्धा घेण्यात आली. हे अभियान राबविण्यात चांदवड नगरपरिषद राज्यात तिसऱ्या क्रमांकाची ठरली आहे. या मुळे पालिकेला दोन कोटींचे बक्षीस मिळाले आहे.माझी वसुंधरा अभियान ४.० हे १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. २५ हजार ते ५० हजार लोकसंख्या असणाऱ्या नगरपरिषदेच्या गटात चांदवड शहराने तिसरा क्रमांक मिळवला आहे. या वर्षी माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये चांदवड नगरपरिषद नवनिर्मित असून देखील उत्तम कामगिरी करून राज्यात २५ हजार ते ५० हजार लोकसंख्या गटामध्ये तिसरा क्रमांक मिळवून दोन कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले आहे.माझी वसुंधरा ४.० मध्ये चांदवड नगरपरिषदेने चांदवड शहरात विविध ठिकाणी वृक्षलागवडीचे कार्यक्रम हाती घेऊन शहरात वृक्षारोपण केले.

Advertisement

त्याचबरोबर स्वच्छतेचे विविध कार्यक्रम, शहरात महाराष्ट्र वृक्ष संवर्धन कायदा अंतर्गत वृक्षतोडीस बंदी करणे, वृक्ष गणना, रोपवाटिका निर्मिती, जैवविविधता नोंदवही, प्लास्टिक पिशवी बंदी, शौचालयाची उपलब्धता, शहरात चार्जिंग स्टेशन, इलेक्ट्रिक वाहनांना चालना देणे, नगरपरिषद मालकीचे सर्व व्यापारी संकुल यांना रेनवॉटर हार्वेस्टिंग करून शोषखड्डे तयार करणे, विहीर पुनर्भरण, जल परीक्षण, नूतनीकरण ऊर्जा स्त्रोत अंतर्गत शहरात सोलर बसवणे, एल.इ.डी. पथदिवे बसवणे, वसुंधरा शपथ, विविध प्रभातफेरी व स्पर्धांचे आयोजन करणे, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणे, घनकचरा व्यवस्थापन या सारखे विविध उपक्रम हाती घेऊन काम पूर्ण केले.माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये चांदवड नगरपरिषदेस २५ ते ५० हजार लोकसंख्या गटात राज्य स्तरावर तिसरा क्रमांक मिळाला असून दोन कोटी रुपयाचे बक्षीस मिळाले आहे. लवकरच बक्षीस वितरण होणार असून बक्षीस वितरण मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते चांदवड नगरपरिषदेस देण्यात येणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!